scorecardresearch

कल्याण मध्ये पोलिसांचा खबरी असल्याचा ओराप करत रिक्षा चालकाचे अपहरण

‘तु आमची गुप्त माहिती पोलिसांना देतो. त्यामुळे पोलीस आम्हाला त्रास देतात,’ असा आरोप करत कल्याण मधील रेतीबंदर भागातील तीन रहिवाशांनी तक्रारदार रिक्षा चालकाचे गुरुवारी रात्री दीड वाजता मित्राच्या घरातून अपहरण केले.

कल्याण मध्ये पोलिसांचा खबरी असल्याचा ओराप करत रिक्षा चालकाचे अपहरण
प्रातिनिधिक छायाचित्र

‘तु आमची गुप्त माहिती पोलिसांना देतो. त्यामुळे पोलीस आम्हाला त्रास देतात,’ असा आरोप करत कल्याण मधील रेतीबंदर भागातील तीन रहिवाशांनी तक्रारदार रिक्षा चालकाचे गुरुवारी रात्री दीड वाजता मित्राच्या घरातून अपहरण केले. त्याला कोनगाव येथील म्हात्रे संकुलाच्या तळमजल्याला नेऊन एका खोलीत बंदिस्त करुन बेदम मारहाण केली.

हेही वाचा >>>ठाणे: शिळडायघर भागात एक हजार किलो गोमांस जप्त; बोगस पोलिसही ताब्यात

मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटका करुन घेत रिक्षा चालक अमान शेख यांनी रात्रीच बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे घडल्या प्रकाराची माहिती देऊन तक्रार दाखल केली. मोहम्मद हुसैन मुनावर शेख, शोएब पोखे, शारीक अशी आरोपींची नावे आहेत. रिक्षा चालक अमान गुरुवारी रात्री आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. तेथे आरोपी मोहम्मद व त्याचे साथीदार आले. त्यांनी गोड बोलून अमानला घराबाहेर बोलावून बळजबरीने एका मोटारीत बसविले. अमान त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. त्याला त्यांनी मारहाण करत कोन गावातील म्हात्रे संकुलातील ई पाख्यातील एका खोलीत नेले. तेथे त्याला ‘तु आमची माहिती पोलिसांना देतोस. तु पोलिसांचा खबरी आहे,’ असे आरोप करत आरोपींनी रिक्षा चालक अमानला बेदम मारहाण केली. खोलीतून सोडले तर अमान पोलीस ठाण्यात जाईल म्हणून आरोपींनी रिक्षा चालक अमानला खोलीत एक तास कोंडून ठेवले. या खोलीतून शिताफीने स्वताची सुटका करुन घेत अमानने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठले. आरोपींविरुध्द तक्रार केली.
उपनिरीक्षक के. एम. शेख याप्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-12-2022 at 17:01 IST

संबंधित बातम्या