scorecardresearch

Premium

गंजलेल्या विजेच्या खांबामुळे दुर्घटनेची शक्यता; डोंबिवली एमआयडीसीतील प्रकार

एमआयडीसीतील मिलापनगर मधील आरएल-७९ या बंगल्या जवळ हा अतिधोकादायक स्थितीमधील खांब उभा आहे.

rusted iron electricity pole MIDC Dombivli collapse accident
एमआयडीसीतील मिलापनगरमधील विजेचा गंजलेला धोकादायक स्थितीमधील खांब. (छायाचित्र- लोकसत्ता टीम)

डोंबिवली: येथील एमआयडीसीतील मिलापनगर भागातील एक बंगल्याच्या शेजारी विजेचा एक खांब गंजला आहे. या खांबावरील वाहिनीतून वीज पुरवठा होत नसला तरी जमिनीलगत गंजलेला लोखंडी विजेचा खांब कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता या भागातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

एमआयडीसीतील मिलापनगर मधील आरएल-७९ या बंगल्या जवळ हा अतिधोकादायक स्थितीमधील खांब उभा आहे. या धोकादायक स्थितीत असलेल्या विजेच्या खांबाजवळून दररोज अनेक पादचारी, शाळकरी मुले, पालक येजा करतात. सकाळ, संध्याकाळ डोंबिवलीतील अनेक रहिवासी या भागात फिरण्यासाठी येतात.

vaccine
विश्लेषण: आणखी एका महासाथीच्या उंबरठय़ावर?
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
falling tree in thane
झाड पडल्याने एक जण जखमी तर त्याभागातील विद्युत पुरवठा खंडीत
pavement-collapsed-in-Mulund
मुलुंडमध्ये पदपथ खचल्याने सहा दुचाकींचे नुकसान

हेही वाचा… कल्याण: बनावट जात दाखल्यांद्वारे कंत्राटी कामगार पालिका सेवेत कायम; राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार

मागील काही दिवसांपासून दररोज संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडतो. यावेळी हा खांब कोसळण्याची भीती आहे. सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर हा खांब आहे. या भागातून येजा करणाऱ्या दुचाकी स्वार, रिक्षा किंवा मोटारीवर हा धोकादायक स्थितीमधील खांब पडला तर दुर्घटना होण्याची शक्यता रहिवाशांनी वर्तविली.

हेही वाचा… मुंब्र्यात दोन महिन्यात आठ मजली बेकायदा इमारतींची उभारणी; आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्रीकांत गडकरी या विजेच्या खांबा शेजारील बंगल्यात राहतात. एक अति महत्वाच्या शासकीय अधिकाऱ्याचे या भागात निवासस्थान असल्याने पोलिसांची या भागात सतत गस्त असते. या भागातील काही रहिवाशांनी याप्रकरणी महावितरणकडे तक्रारी केल्या आहेत. त्याची दखल घेतली जात नाही, असे रहिवाशांनी सांगितले. काही दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने तातडीने हा धोकादायक स्थितीमधील विजेचा खांब काढून टाकावा, अशी मागणी रहिवाशांची आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A rusted iron electricity pole at midc in dombivli is likely to collapse and cause an accident dvr

First published on: 03-10-2023 at 12:08 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×