scorecardresearch

Premium

डोंबिवली नागरी सहकारी बँकेत भुरट्याकडून ग्राहकाची फसवणूक

या प्रकरणी ग्राहकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

thief cheated bank customer Dombivli Nagari Cooperative Bank
डोंबिवली नागरी सहकारी बँकेत भुरट्याकडून ग्राहकाची फसवणूक

लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पश्चिमेतील डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या विष्णुनगर शाखेत एका भुरट्या चोराने एका बँक ग्राहकाची फसवणूक केली आहे. या प्रकरणी ग्राहकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. रविवारी दुपारी हा प्रकार घडला आहे.

Two accused who raped minor girl
चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्यांना कारागृहातून घेतले ताब्यात; दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी
protest against sugar factory kolhapur
कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यावर आंदोलन
consumer court order to pay compensation to farmers for ignoring complaint
बियाणे उगवले नाही; कृषी अधिकाऱ्याला दणका, शेतकऱ्यास नुकसानभरपाई देण्याचे ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे आदेश
MNS Protest
“टोलनाक्यावर दगडं मारून एकनाथ शिंदे…”, मनसे नेत्याची टीका; आंदोलन केल्याने पोलिसांनी घेतलं ताब्यात!

मनोज वसंत खाडे (४९) असे फसवणूक झालेल्या ग्राहकाचे नाव आहे. ते नोकरदार आहेत. ते कोपर रेल्वे स्थानकाजवळील एका सोसायटीत राहतात. रविवारी दुपारी बाराच्या दरम्यान तक्रारदार मनोज खाडे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या विष्णुनगर शाखेत आपल्या बँक खात्यामधून पैसे काढण्यासाठी आले होते. खात्यामधून त्यांनी १२ हजार ६७० रुपये काढले. रोखपालाच्या समोरुन बाजुला झाल्यानंतर ते जवळील पैसे मोजत होते. तेवढ्यात एक अज्ञात इसम त्यांच्या समोर आला. त्याने मनोज यांना ‘तुम्ही बँकेतून काढलेल्या नोटांचे अनुक्रमांक एकापाठोपाठच्या क्रमांकाने नाहीत.

हेही वाचा… डोंबिवलीत सुनीलनगरमध्ये ‘ग’ प्रभाग कार्यालयासमोर बेकायदा इमारतीची उभारणी

मी तुम्हाला ज्या अनुक्रमांकांच्या नोटा पाठोपाठ नाहीत त्या काढून देतो,’ असे बोलून भामट्याने मनोज यांच्या हातामधील रक्कम स्वताकडे घेतली. त्यामधील सहा हजार ५०० रुपयांच्या नोटा हातचलाखीने काढून स्वताकडे ठेवल्या. उर्वरित रक्कम भामट्याने पुन्हा मनोज यांच्या ताब्यात दिली. खाडेंना भुरट्याने तुम्ही पुन्हा रोखपालाकडे जा. त्यांना मला पाठोपाठ अनुक्रमांक असलेल्या नोटा द्या असे सांगा, असे सांगितले. त्याप्रमाणे मनोज पुन्हा रोखपालाकडे गेले. त्यांनी जवळील नोटा मोजल्या. त्यात सहा हजार ५०० रुपयांची रक्कम कमी पडत होती.

हेही वाचा… डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर नागरी वस्तीत दारूचे अड्डे, महिला, शाळकरी विद्यार्थी सर्वाधिक त्रस्त

खात्यामधून १२ हजार ६७० रुपये काढले असताना उर्वरित रक्कम कशी गहाळ झाली, असा प्रश्न तक्रारदाराला पडला. त्यांनी ज्या इसमाने अनुक्रमांक बदलण्यासाठी नोटा हातात घेतल्या होत्या. त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न केला तर, तो इसम तेथून पळून गेला होता. संबंधित भुरट्यानेच आपली फसवणूक केली आहे, अशी ठाम खात्री झाल्यावर मनोज खाडे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. साहाय्यक पोलीस निरीक्षक सचीन लोखंडे या प्रकरणाचा तपास करत आहेत. बँक आणि परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A thief has cheated a bank customer in dombivli nagari cooperative bank dvr

First published on: 13-09-2023 at 16:15 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×