कल्याण: मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, नाशिक, नगर जिल्ह्यांच्या हद्दीत चोऱ्या, लुटमारा करणारा, तर कधी पोलीस असल्याची खोटी माहिती देऊन नागरिकांना फसविणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी बुधवारी आंबिवली (मोहने) भागातून अटक केली. गुलाम अली सरताज अली जाफरी उर्फ नादर असे गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात ४० हून अधिक गुन्हे दाखल आहेत.

खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या पथकाने ही अटकेची कारवाई केली. पोलीस असल्याची खोटी माहिती नागरिकांना देऊन लुटमार करणारा एक गुन्हेगार आंबिवली जवळील मोहने गाव परिसरात येणार आहे, अशी माहिती खडकपाडा गुन्हे प्रकटीकरण शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांना मिळाली.

wardha lok sabha constituency, Amar Kale, sharad pawar ncp, amra kale campaign, Faces Setback , Complaints of Financial Mismanagement, amar kale not spending money, finance in campaign,
वर्धा : ‘हवेत राहू नका ‘, अमर काळे यांना सहकाऱ्यांचा इशारा
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
Girish Bapat photograph
धंगेकरांच्या प्रचारासाठी गिरीश बापट यांच्या छायाचित्राचा वापर? छायाचित्र वापरण्यास बापट यांच्या चिरंजीवांचा आक्षेप
farmers loan subsidies stalled due to indifference of co operative department officials auditors says hasan mushrif
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुदान सहकार खात्याचे अधिकारी, लेखापरीक्षकांच्या उदासीनतेमुळे रखडले – हसन मुश्रीफ

या पथकाने आंबिवली, मोहने परिसरात बुधवारी सापळा लावला. ठरल्या वेळेत मोहने परिसरात एक अनोळखी व्यक्ति फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. एका पोलिसाने त्याला हटकताच तो पळून जाण्याचा प्रयत्न केला. सापळा लावलेल्या पोलिसांनी त्याला घेरुन पकडले. त्याने आपले नाव गुलाम जाफरी असल्याचे पोलिसांना सांगितले. नागरिकांना आपण पोलीस आहोत असे सांगून, वाहने अडवून त्यांची लुटमार करणारा हाच तो आरोपी असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी जाफरीला अटक केली.

मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात जाफरीवर एकूण ४० गुन्हे दाखल आहेत. चोरी, लुटमार, ऐवज लुटून नेणे, पोलीस असल्याचे खोटे सांगून नागरिकांची फसवणूक करणे असे प्रकार जाफरी याने केले आहेत. खडकपाडा पोलीस एका प्रकरणात जाफरीच्या मागावर होते. तोच आता पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.

जाफरीकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. विविध पोलीस ठाण्यांना त्याची चोरीच्या गुन्हे प्रकरणात गरज आहे. ज्या पोलीस ठाण्यांना जाफरी चौकशीसाठी पाहिजे, त्यांनी कल्याण मधील खडकपाडा पोलीस ठाण्याशी साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वसई, विरार, नवघर, नवी मुंबई, दादर, कल्याण, डोंबिवली, पुणे, नाशिक, नगर जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात जाफरीवर गुन्हे दाखल आहेत.