scorecardresearch

ठाणे : अचानक लागलेल्या आगीत टीएमटी बस जळून खाक

आगारात उभ्या असलेल्या बसगाडीला अचानक आग लागली. ही बसगाडी विजेवरील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

ठाणे : अचानक लागलेल्या आगीत टीएमटी बस जळून खाक
अचानक लागलेल्या आगीत टीएमटी बस जळून खाक

लोकमान्यनगर येथे ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाडीला सोमवारी सांयकाळी अचानक आग लागल्याची घटना उघडकीस आली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण बसगाडी जळून खाक झाली. या बसगाडीमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. बसगाडी ही विजेवरील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग विजविली.

हेही वाचा- ठाणे जिल्ह्यात सहा महिन्यात २५६ आत्महत्या; २० अल्पवयीन मुलांनी संपवले जीवन

लोकमान्यनगर येथे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसगाड्यांचे आगार आहे. सोमवारी सांयकाळी ५ वाजताच्या सुमारास आगारात उभ्या असलेल्या बसगाडीला अचानक आग लागली. ही बसगाडी विजेवरील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती आगारातील कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलास दिल्यानंतर दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विजविली. पंरतु बसगाडीचा केवळ सांगाडा शिल्लक होता. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती कळू शकलेली नव्हती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 18:46 IST

संबंधित बातम्या