डोंबिवलीत महिलेला तरुणाची बेदम मारहाण |A young man brutally beat up a woman in Dombivli east railway station | Loksatta

डोंबिवलीत महिलेला तरुणाची बेदम मारहाण

हातामधील लोखंडी कड्यांनी मारहाण झाल्याने महिलेच्या अंगावर जखमा झाल्या आहेत.

A young man brutally beat up a woman in Dombivli east railway station
प्रातिनिधिक छायाचित्र / लोकसत्ता

डोंबिवली : डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील गर्दीतून वाट काढत रामनगर भागातील रिक्षा वाहनतळावर पायी चाललेल्या एका महिलेचा धक्का दोन तरुणांना लागला. महिलेने आपणास मुद्दाम धक्का मारला म्हणून एका तरुणाने महिलेला जाब विचारुन रस्त्यावरच बेदम मारहाण सुरू केली. हातामधील लोखंडी कड्यांनी मारहाण झाल्याने महिलेच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. रविवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात हा प्रकार घडला.

महिलेने रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करताच पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणाचा नाव, पत्ता शोधून त्याला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सोहम संतोष सावंत (२१, रा. जय भोले सोसायटी, दातिवली गाव, दिवा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, अंजली देवडिगा (६४, प्रभा सोसायटी, तुकारामनगर , डोंबिवली) या रविवारी संध्याकाळी सहा वाजता डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात भाजीपाला खरेदीसाठी आल्या होत्या. बाजारपेठेत खरेदी झाल्यानंतर त्या रामनगर मधील तुकारामनगर रिक्षा वाहनतळाकडे पायी चालल्या होत्या.

हेही वाचा : ठाण्यात महाप्रबोधन यात्रेला ठाकरे समर्थकांची मोठी गर्दी

रविवार सुट्टीचा दिवस खरेदीसाठी गर्दी असल्याने पायी चालताना तक्रारदार अंजली यांचा धक्का बाजुने चाललेल्या दोन तरुणांना लागला. अंजली यांनी याबद्दल चूक मान्य केली. तरीही आपणास मुद्दाम धक्का मारला म्हणून आरोपी संतोष सावंत याने अंजली यांना भररस्त्यात बेदम मारहाण सुरू केली. इतर नागरिकांनी संतोषला रोखण्याचा प्रयत्न केला तरी तो ऐकत नव्हता. स्वताच्या हातामधील कड्याने तो महिलेला मारहाण करत होता. या मारहाणीचे व्रण आणि त्याच्या जखमा अंजली यांना झाल्या आहेत. अंजली यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-10-2022 at 11:47 IST
Next Story
विश्लेषण : नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचे घोडे नेमके अडले कुठे?