A young woman brutally beaten over a love affair in Dombivli thane | Loksatta

प्रेमप्रकरणाच्या बाचाबाचीतून डोंबिवलीत ठाण्याच्या तरुणीला बेदम मारहाण

प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू असताना शाब्दिक बाचाबाची झाली आणि वादावादीच रुपांतर मारामारीत झालं.

प्रेमप्रकरणाच्या बाचाबाचीतून डोंबिवलीत ठाण्याच्या तरुणीला बेदम मारहाण
उधारीवर दारू न दिल्याने मद्यालयाच्या मालकावर हल्ला

मित्रांच्या एका गटामध्ये प्रेम प्रकरणातून बाचाबाची झाली. या बाचाबाची मधून ठाण्यातील एका तरुणीला मित्रांच्या गटाने ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावर बोलावून गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या तरुणीच्या कपाळाला दगड मारण्यात आल्याने गंभीर दुखापत झाली आहे.

हेही वाचा- क्रिकेट खेळण्यावरुन वाद; शहापूर सावरोलीच्या दोन जणांना एकाच गुन्ह्यात चार सक्तमजुरीच्या शिक्षा

कशीश गायकवाड, खुशी कदम, नेहा धनगर, नेहा अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. ऋतिका कुंभार (१९, रा. सावंत चाळ, सिध्देश्वर तलाव, ठाणे) असे तक्रारदार तरुणीचे नाव आहे. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे खास परिचित आहेत. या मित्रांच्या गटामध्ये प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू असताना शाब्दिक बाचाबाची झाली. या विषयात तक्रारदार ऋतिका आणि आरोपी नेहा धनगर यांच्यात वादावादी झाली.

हेही वाचा- कोपरीतील शिवसेना शाखेवरून वाद; शिंदे गट आणि शिवसैनिक आमने- सामने, अखेर पोलिसांनी काढला मार्ग

या विषयावर चर्चा करण्यासाठी फियार्दी ऋतिका आणि चार आरोपी गुरुवारी रात्री साडे नऊ वाजता ठाकुर्लीतील ९० फुटी रस्त्यावरील बेबो हाॅटेलच्या समोरील बाजूला जमा झाले. तेथे त्यांच्यात प्रेमप्रकरणातून बोलाचाली सुरू असताना आरोपींनी तक्रारदार ऋतिकाला जाब विचारुन तिला हात, लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. नेहा धनगर हिने एक दगड ऋतिकाच्या कपाळाला मारला. त्यामुळे तिच्या कपाळाला जखम झाली आहे. टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
क्रिकेट खेळण्यावरुन वाद; शहापूर सावरोलीच्या दोन जणांना एकाच गुन्ह्यात चार सक्तमजुरीच्या शिक्षा

संबंधित बातम्या

डोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले
गणेशोत्सवात खड्डय़ांचे विघ्न
वाहन खरेदीच्या बहाण्याने डोंबिवलीतील व्यावसायिकाची फसवणूक
डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानका जवळील स्कायवाॅकचे कठडे तुटल्याने अपघाताची शक्यता

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आता पोलीस हवालदारपदासाठी तृतीयपंथीयांनाही अर्ज करणे शक्य
Himachal Pradesh Election 2022 : काँग्रेसपुढे नेतानिवडीचा पेच; मुख्यमंत्रीपदावर तिघांचा दावा
अनुराग ठाकूर यांच्या जिल्ह्यात सर्व जागांवर भाजप पराभूत!; प्रेमकुमार धुमल यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजी
शरद पवारांसह राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे?
India Bangladesh 3rd ODI : बांगलादेशविरुद्ध सपशेल अपयशाची नामुष्की टाळण्याचे भारताचे लक्ष्य!