scorecardresearch

Premium

टिटवाळ्यात तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण

या तीन मुलांचा कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती कोठेच आढळुन न आल्याने या मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली आहे.

kidnap case
(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र, लोकसत्ता)

कल्याण: टिटवाळा येथील बनेली भागातील तीन अल्पवयीन मुले बुधवारी दुपारपासून बेपत्ता झाली आहेत. या तीन मुलांचा कुटुंबीयांनी शोध घेऊनही ती कोठेच आढळुन न आल्याने या मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार केली आहे. पोलिसांनी विशेष पथके तयार करुन या अपहृत मुलांचा शोध सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले, बनेली गावातील तीन वेगळ्या घरांमधील मुले खेळण्यासाठी दुपारी घराबाहेर पडली. संध्याकाळ झाली तरी मुले घरी आली नाहीत म्हणून पालकांनी बनेली, टिटवाळा, मांडा भागात मुलांचा शोध घेतला. मुले कोठेच आढळुन आली नाहीत. मुलांचे अज्ञात इसमाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करुन मुलांच्या पालकांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. बनेली, मांडा, टिटवाळा भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून मुलांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Prostitution by a 15-year-old girl
नागपूर: गंगाजमुनात १५ वर्षीय मुलीकडून देहव्यापार
lost to the world
अतिरेक्यांच्या ताब्यातील पाच भीषण वर्षे..
pune organ donation, organs donated in pune, brain dead organs donated, 3 lifes saved from the donated organs in pune
अवयवदानातून वाचले तीन जणांचे जीव
interruption of electricity in industrial area, nashik industrial area, ambad industrial area, industrialists lose crores of rupees due to interruption of power supply
खंडित वीज पुरवठ्यामुळे अंबड वसाहतीत कोट्यवधींचे नुकसान; नाशिकमध्ये उद्योजकांचे ठिय्या आंदोलन

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Abduction of three minors in titwala kidnapping complaint in police station ysh

First published on: 24-08-2023 at 21:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×