ठाणे : नातेवाइकाला जाळ्यात अडकवून त्याचे अपहरण करून त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. लाल मोहम्मद फकीर, शकील फकीर आणि नेहालाल फकीर अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून पूर्व वैमन्यस्यातून त्यांनी हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

  गोरेगाव येथे २० वर्षीय तरुण राहतो. सुमारे महिन्याभरापूर्वी त्याला इंदू या नावाने समाजमाध्यमावर एक संदेश आला. या संदेशाला तरुणाने उत्तर दिले. दररोज दोघांमध्ये संभाषण होऊ लागले आणि दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर इंदू त्याला अश्लील संदेश पाठवू लागली. तरुणाकडूनही त्यास प्रतिसाद मिळू लागला. ५ फेब्रुवारीला इंदूने त्यास भेटण्यासाठी नारपोली येथील एका ठिकाणी बोलावून घेतले.

gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक
gold
पाडव्याला सुवर्णझळाळी योग; शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
Sonam Wangchuk
लेख: लडाखवासींची लोककेंद्री विकासासाठी हाक

तरुण त्याच्या एका मित्रासोबत त्याठिकाणी पोहचला असता लाल, शकील आणि नेहालाल हे एका टॅक्सीमध्ये त्याठिकाणी आले. त्यांनी दोघांचेही अपहरण करून एका घरामध्ये डांबून ठेवले.

तिघांनी तरुणाकडून २० हजार रुपयांची मागणी केली. तरुणाने त्याच्या घरी संपर्क साधून २० हजार रुपये एका बँक खात्यावर पाठविण्यास सांगितले. या घटनेची माहिती तरुणाच्या भावाने तात्काळ शांतीनगर पोलिसांना दिली.

अपहरणकर्ते पैसे घेण्यासाठी शांतीनगर येथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता पूर्व वैमन्यस्यातून इंदू या नावाने बनावट खाते तयार करून त्यांनी या अपहरणाचा डाव रचल्याची कबुली दिली. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.