scorecardresearch

अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार

गेल्या आठवड्यापासून पालिका तसेच राजकीय वर्तुळात शर्मा यांची बदली निश्चित झाली असल्याची चर्चा सुरू झाली होती.

अभिजीत बांगर आज घेणार ठाणे महापालिका आयुक्त पदाचा पदभार
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

ठाणे : महापालिका आयुक्त पदावर नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली असून ते शुक्रवारी दुपारी ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची बदली होणार असल्याची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू होती. गेल्या आठवड्यापासून पालिका तसेच राजकीय वर्तुळात शर्मा यांची बदली निश्चित झाली असल्याची चर्चा सुरू झाली होती.

असे असतानाच शुक्रवारी राज्य सरकारने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले असून त्यात आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर, त्यांच्या बदलीमुळे रिक्त जागेवर झालेल्या नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची राज्य सरकारने नियुक्ती केली असून ते शुक्रवारी दुपारी 3 वाजता ठाणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत,अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या