घोडबंदरवासीयांना मुबलक पाणी

नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसराचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले असून या भागाला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी कासारवडवली भागात उभारलेल्या पंप हाऊस आणि दोन जलकुभांचे पालिकेने नुकतेच लोकार्पण केले.

पंपहाऊससह दोन जलकुंभांचे लोकार्पण

ठाणे : नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसराचे गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने नागरीकरण झाले असून या भागाला भेडसावणारी पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी कासारवडवली भागात उभारलेल्या पंप हाऊस आणि दोन जलकुभांचे पालिकेने नुकतेच लोकार्पण केले. नव्या जलकुंभाचा ८० हजार नागरिकांना होणार फायदा होणार असून त्याचबरोबर घोडबंदरवासीयांना नियमित आणि मुबलक पाणीही मिळणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. 

घोडबंदर परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या तुलनेत पाणीपुरवठा कमी होत असल्याने गेल्या काही वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे. अनेक गृहसंकुलांना टँकरचे पाणी खरेदी करून गरज भागवावी लागते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेने कासारवडवली परिसरात पालिकेने दोन जलकुंभ आणि पंप हाऊस उभारले आहेत. या जलकुंभातून घोडबंदर भागाला प्रतिदिन १२ दशलक्षलिटर इतका पाणीपुरवठा होणार आहे. तसेच १५ दशलक्षलिटर क्षमतेच्या संपमधून १०० अश्वशक्तीच्या तीन पंपाद्वारे पाणी उचलण्यात येणार आहे.

या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा महापौर नरेश म्हस्के आणि खासदार राजन विचारे यांच्या उपस्थितीत बुधवारी पार पडला. या दोन्ही जलकुंभामुळे घोडबंदर भागातील पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे.

यामध्ये हावरे सिटी, रौनक हाईट, रोझा गार्डनिया, पारिजात गार्डन, महावीर कल्पवृक्ष, पाचवड पाडा, पुराणिक टोक्यो बे, वेदांत हॉस्पिटल, विहंग व्हॅली, उन्नती ग्रीन, प्लॅटिनम लॉन्स, कॉसमॉस ज्वेल्स, पार्क वुड, युनिक ग्रीन, साईनगर, भक्तीपार्क, ऋतू एन्क्लेव्ह, संघवी हिल्स, ग्रीन स्क्वेअर, ग्रॅण्ड स्क्वेअर सुदर्शन स्काय गार्डन या भागातील ८० हजार नागरिकांना याचा फायदा होणार असल्याचा दावा पालिकेने केला आहे. महापालिका क्षेत्राच्या इतर भागांतही टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा मुबलक होईल यादृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्याची कार्यवाही सुरू असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Abundant water horsemen ysh

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या