ठाण्याच्या हिरानंदनी परिसरात मंगळवारी एका अल्पवयीन कारचालकाने वृद्ध महिलेला उडवल्याची घटना घडली. या घटनेत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. काल संध्याकाळी प्रथमेश अय्यर (१७) हा अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत गाडी चालवत होता. त्यावेळी ही वृद्ध महिला जवळच असलेल्या एटीएममध्ये जात होती. तेव्हा प्रथमेश अय्यरने कारने या महिलेला उडवले.प्रथमेश अय्यर हा हिरानंदनी फाऊंडेशन स्कुलचा विद्यार्थी असून तो १७ वर्षांचा आहे. अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देण्याचा निष्काळजीपणा केल्यामुळे रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी प्रथमेश अय्यर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.