scorecardresearch

ठाण्यात भीषण अपघात; चार मित्र प्रवास करत असलेल्या कारचा धडकेनंतर चेंदामेंदा

ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा भागात भरधाव कारची पथदिव्याला धडक

ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावरील माजीवडा भागात रविवारी सकाळी एका भरधाव कारची पथदिव्याला धडक बसली. या घटनेत कारमधील इजलाल खान (१८) , असद खान (१७), ताहीर खान (२१) अरहम खान (१८) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अरहम हा ठाण्यातील हाजुरी येथून त्याच्या कारने नाशिकच्या दिशेने जात होता. त्यावेळी त्याच्यासोबत असद, ताहीर आणि इजलाल हे तिघे होते. कार माजीवडा परिसरात आली असता अरहमचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार येथील एका पथदिव्याला धडकली. या घटनेत चौघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही कार भरधाव होती अशी माहिती पोलिसांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accident in thane after car crash to divider sgy

ताज्या बातम्या