scorecardresearch

Premium

मीरा रोडमध्ये पोलिसावर हल्ला करून आरोपी फरार, पोलिसाची प्रकृती गंभीर

पोलिसावर हल्ला करून आरोपी पळून गेल्याची घटना मीरा रोड मध्ये घडली आहे.

crime in mira road
मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या कार्यालयात रविवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास ही घटना घडली.(फोटो सौजन्य- प्रातिनिधिक छायाचित्र)

लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

मीरारोड- पोलिसावर हल्ला करून आरोपी पळून गेल्याची घटना मीरा रोडमध्ये घडली आहे. जयकुमार राठोड असे या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या कार्यालयात रविवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी बेड्यांसह फरार झाला असून त्याच्या शोधासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे.

hamas attack israel president netyanahu
गाझापट्टीत युद्धाचा भडका; ‘हमास’च्या हल्ल्यानंतर इस्रायलचा प्रतिहल्ला; ३०० मृत्यू, हजारो जखमी
israel
इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात गाझामध्ये मृतांचा खच; १९८ जणांचा मृत्यू, १६०० जखमी
Mufti Qaiser Farooq shot dead
VIDEO: २६/११चा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या साथीदाराची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या
Is Ukraines Counteroffensive Succeeding
विश्लेषण: रशिया-युक्रेन युद्ध कोणत्या वळणावर आहे? युक्रेनचा प्रतिहल्ला यशस्वी ठरतोय का?

आणखी वाचा-ठाण्यात धावत्या कारनं अचानक पेट घेतला, ७ जण थोडक्यात बचावले!

मीरा रोड येथील गुन्हे शाखेच्या इमारतीत मध्यवर्ती गुन्हे शाखेचे कार्यालय आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने मोबाईल चोरीच्या प्रकरणात एका आरोपीला अटक केली होती. या आरोपीला हातात बेड्या घालण्यात आल्या होत्या. बंदोबस्ताला दोन पोलीस होते. रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास बंदोबस्तावरील एक पोलीस कर्मचारी जेवण आणण्यासाठी गेला. जयकुमार राठोड हा पोलीस हवालदार कार्यालयात होता. ती संधी साधून आरोपींना बेडीतून हात बाहेर काढला. लोखंडी रॉडने जयकुमार राठोड यांच्या डोक्यावर हल्ला केला आणि कार्यालातून पळून गेला. राठोड यांच्या डोक्यावर तीन ठिकाणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी आधी लाईफ लाईन रुग्णालयात नेण्यात आले होते. नंतर त्यांच्या मीरा रोडच्या वोक्हार्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. हल्ला करणारा आरोपी हा नशेबाज होता.

दरम्यान, आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेचे वेगवेगळे पथक तयार करण्यात आले असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Accused absconding after attack on police in mira road mrj

First published on: 04-09-2023 at 12:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×