कल्याण – कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत चौकशीसाठी असलेला आरोपी शुक्रवारी दुपारी स्वच्छतागृहाच्या पाठीमागील तार उचकटून पळून गेला. गस्तीवरील पोलिसांनी त्याचा उल्हासनगरपर्यंत पाठलाग करून त्याला तात्काळ अटक केली. युवराज दिनकर सरतापे (२८) असे आरोपीचे नाव आहे. तो उल्हासनगरमधील लालचक्की भागात राहतो.

एका गुन्ह्याच्या तपासासाठी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याला काल दुपारी चौकशीसाठी गस्तीवरील पोलिसांनी बाहेर काढले. त्याला लघुशंका आल्याने पोलीस ठाण्याबाहेरील स्वच्छतागृहात नेण्यात आले. स्वच्छतागृहाच्या बाहेर दोन पोलीस उभे होते. बराच वेळ झाल्यानंतरही आरोपी बाहेर येत नाही म्हणून पोलीस हवालदार जाधव, पठाण यांनी दरवाजावर टकटक केली. आरोपी आत नव्हता. त्याचवेळी स्वच्छतागृहाच्या पाठीमागील बाजूची जाळी काढून, संरक्षित भिंतीवरील तार काढून युवराजने भिंतीवरून उडी मारून पळ काढला होता. याची चाहूल लागताच पोलिसांनी त्याचा पाठलाग उल्हासनगरमधील घरापर्यंत केला.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा – Maharashtra SSC Result: ३५ टक्के काठावर पास! ठाण्यातील विद्यार्थ्यांने सर्व विषयामध्ये मिळवले परफेक्ट ३५ गुण; म्हणाला, “मी पास..”

रस्ते, गल्लीबोळातून पळून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न आरोपीने केला. त्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. लालचक्की भागातील घराच्या परिसरातून युवराजला अटक करण्यात आली. त्याच्यावर लोहमार्ग पोलीस ठाण्यात हवालदार प्रीतम मोहिते यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader