ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई शनिवारी करण्यात आली. रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्थेस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने ही कारवाई केली.

ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुसज्ज प्रसुती कक्ष आणि शस्त्रक्रीया विभाग तयार करण्यात आला असून त्याचबरोबर रुग्णालयात रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय उभारण्यात आलेले आहे. या प्रकल्पांचे शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान रुग्णालयातील डाॅक्टरांच्या वसतीगृहाच्या दुरावस्था असल्याची बाब मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आली होती. याशिवाय, तेथील महिला डाॅक्टरांनी या दुरावस्थेसह त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या तक्रारी करताच मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये डाॅक्टर चांगले काम करीत आहेत. पण, रुग्णांना सेवा देणाऱ्या डाॅक्टरांच्या वसतीगृहाची परिस्थिती चांगली नाही. यासाठी जे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी दिले. या आदेशानंतर आयुक्त बांगर यांनी तातडीने महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठता डाॅ. योगेश शर्मा आणि उप अधिष्ठाता डॉ. सुचितकुमार कामखेडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्या जागी अद्याप कुणालाही पदभार देण्यात आलेला नाही. या वृत्तास आयुक्त बांगर यांनी दुजोरा दिला आहे.

dharashiv, show of strength dharashiv
धाराशिवच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन
kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…