डोंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी बेकायदा इमारतीवर कारवाई करत नाहीत म्हणून डोंबिवलीतील कोपर भागातील एका तक्रारदाराने मुंबईतील राज्य मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. या प्रकरणी तक्रारदार आणि पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांनी कोपर मधील बेकायदा इमारत तोडण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे ह प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी मंंगळवारी कोपर मधील बेकायदा इमारतीवर कारवाई केली.

ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत, अधीक्षक अरूण पाटील यांच्यासह विष्णुनगर पोलिसांच्या उपस्थितीत तोडकाम पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई करताना या इमारतींच्या फक्त भिंतीच तोडण्यात आल्या. या इमारतींचे आधार खांब तोडण्यात न आल्याने तक्रारदाराने नाराजी व्यक्त केली. कोपर मधील बानुबाई बबन म्हा्त्रे यांनी एका भूमाफियाच्या सहकार्याने पालिकेच्या बांधकाम परवानग्या न घेता दोन माळ्याची बेकायदा इमारत उभारली होती.

bjp, illegal building
डोंबिवलीतील सागाव येथील बेकायदा इमारत तोडण्यास भाजप पदाधिकाऱ्यांचा अडथळा, उच्च न्यायालयाच्या इमारत तोडण्याच्या आदेशाकडे दुर्लक्ष
land mafias, demolition, protest, illegal building, Dombivli
बेकायदा इमारत तोडण्यास विरोध करणाऱ्या आंदोलनातील भूमाफियांचा डोंबिवलीतून पळ?
Regency Anantam Water Cut Issue
डोंबिवलीतील हाय प्रोफाईल गृहसंकुल प्रकल्पात पाण्याचा खडखडाट, घरं खरेदी केलेल्या लोकांची निराशा
Dombivli, Kalyan Dombivli municipality, illegal building, Radhai complex, demolition, Manpada police, court order, police security, Bombay High Court, fake documents, BJP opposition, land owner, fir against mobs including residents
डोंबिवलीतील बेकायदा राधाई गृहसंकुल तोडण्यास विरोध केल्याने रहिवाशांसह जमावावर गुन्हे
illegal building in Navapada area
डोंबिवलीतील नवापाडा भागातील बेकायदा इमारतीवर हातोडा; ह प्रभागातील १० इमारतींवर कारवाईची तक्रारदारांची मागणी
41 illegal buildings of Agrawal nagari
वसई: अग्रवाल नगरी मधील ४१ अनधिकृत इमारती पाडण्याचे न्यायालयाचे आदेश; पालिकेकडून घरे खाली करण्याच्या नोटिसा, रहिवाशी हवालदील
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Theft of gold by tricking a jeweler on Gupte Road in Dombivli
डोंबिवलीत गुप्ते रोडवरील जवाहिऱ्याला फसवून सोन्याच्या ऐवजाची चोरी

हेही वाचा >>>डोंबिवलीत गुप्ते रोडवरील जवाहिऱ्याला फसवून सोन्याच्या ऐवजाची चोरी

ही इमारत बेकायदा असल्याने ती तोडण्यात यावी म्हणून तक्रारदाराने पालिका आयुक्तांंपासून ते प्रभाग साहाय्यक आयुक्तांपर्यंत अनेक तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल अधिकारी घेत नव्हते. तक्रारदाराने राज्य मानवी हक्क आयोगाकडे बानुबाई म्हात्रे यांच्या बेकायदा इमारतीची तक्रार केली होती. आयोगाने पालिका, तक्रारदार यांचे म्हणणे ऐकून घेतले. पालिकेला बानुबाई म्हात्रे यांच्या इमारतीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

साहाय्यक आयुक्त सावंत यांच्या पथकाने मंंगळवारी या इमारतीवर हातोडा चालविला. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रहिवासी राहत असल्याने तळ मजल्याचे व्यापारी गाळे आणि पहिल्या मजल्यावरील बांधकामावर पथकाने कारवाई केली. दुसऱ्या माळ्यावरील कुटुंबीयाना पोलीस बंदोबस्तात बाहेर काढून बानुबाई यांची बेकायदा इमारत भुईसपाट करण्याची मागणी नागरिकांंकडून आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्याकडे करण्यात येणार आहे.

कोपरमध्ये विरोध

कोपरमध्ये सर्वाधिक बेकायदा इमारती आहेत. या भागातील एका बेकायदा इमारतीवर कारवाई करण्यासाठी बुधवारी ह प्रभागाचे पथक गेले होेत. रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. राजकीय विरोधामुळे मागील अनेक वर्ष कोपर प्रभागात कधीच बेकायदा बांंधकामांच्या विरुध्द पालिकेकडून कारवाई करण्यात आली नाही.

हेही वाचा >>>ठाणे : कोलशेत खाडी भागातील राडारोड्याचा भराव पालिका काढणार

नऊ बांधकामांना अभय

मागील दीड वर्षाच्या कालावधीत ह प्रभागातील जुनी डोंबिवलीत प्रकाश गोठे, शंकर ठाकूर यांच्या दोन बेकायदा इमारती, गरीबाचापाडा श्रीधर म्हात्रे चौकातील आरक्षित भूखंडावरील वसंंत हेरिटेज, ठाकुरवाडीतील शाळेच्या आरक्षणावरील शिवलिला, उमेशनगर जवळील राहुलनगर मधील रमाकांत आर्केड, सुदामा रेसिडेन्सी, कोपर सखारामनगर काॅम्पलेक्स जवळील आरक्षित भूखंडावरील दोन बेकायदा इमारती, कोपर रेल्वे स्थानकाजवळील शैलेश पाटीलचा कोंबड्याचा खुराडा, खंडोबा मंदिरासमोरील बेकायदा इमारत, चरू बामा शाळे पाठीमागील निर्माणाधिन बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत.

मानवी हक्क आयोगाच्या आदेशाप्रमाणे बानुबाई म्हात्रे यांच्या बेकायदा इमारतीवर कारवाई केली आहे. या इमारतीच्या एक मजल्यावर एक कुटुंब राहते. तेथे कारवाई करता आली नाही. ह प्रभागातील तक्रारीप्राप्त आणि इतर सर्व बेकायदा बांधकामे भुईसपाट केली जाणार आहेत.-राजेश सावंत,साहाय्यक आयुक्त,ह प्रभाग, डोंबिवली.