लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: शहराच्या मध्यवर्ती भागातील सुप्रसिद्ध ‘प्रशांत कॉर्नर’ या मिठाईच्या दुकानासमोरील बेकायदा बांधकामासह शेडवर पालिका प्रशासनाने नुकतीच कारवाई केली आहे. या कारवाईनंतर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे

ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात सुप्रसिद्ध ‘प्रशांत कॉर्नर’ हे मिठाईचे दुकान आहे. या दुकानांमध्ये मिठाई घेण्यासाठी दररोज मोठी गर्दी असते. या दुकानासमोरील जागेत एक शेड उभारण्यात आली होती आणि त्याचबरोबर बांधकामही करण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या या बेकायदा बांधकामावर पालिका अतिक्रमण विभागाच्या पथकाने नुकतीच कारवाई केली. यामध्ये बांधकाम आणि शेड तोडून टाकण्यात आली.

(व्हिडिओ- लोकसत्ता टीम)

हेही वाचा...प्रशासकीय यंत्रणांच्या घोळात वाहनचालकाचा मृत्यू, रस्ता रूंदीकरणात वीजवाहिन्या उंच न केल्याने चालक होरपळला

दरम्यान, या परिसरात अनेक दुकानांनी बेकायदा शेड उभारण्याबरोबरच बेकायदा बांधकाम केले आहे. परंतु ‘प्रशांत कॉर्नर’ या दुकानावरच केवळ कारवाई झाल्याने समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.