बेजबाबदार वाहन चालकांमुळे शिळफाटा पुन्हा कोंडीत

डोंबिवली- कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अनेक बेजबाबदार वाहन चालक वळसा टाळण्यासाठी, वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उलट मार्गिकेतून वाहने चालवून सुरळीत असलेल्या मार्गिकेत वाहन कोंडी करतात. अशा बेशिस्त वाहन चालकांवर कोळसेवाडी, मुंब्रा वाहतूक विभागाने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. मंगळवारी संध्याकाळी पाच ते रात्री १० वाजेपर्यंत १६७ चारचाकी, दुचाकी, रिक्षा चालकांवर कारवाई केली आहे, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

मागील दोन वर्षापासून शिळफाटा रस्त्यावर अनेक बेशिस्त चालक वाहतूक पोलिसांची नजर चुकवून उलट मार्गिकेतून प्रवास करतात. हे वाहन चालक अनेक वेळा सुरळीत असलेल्या शिळफाटा रस्त्यावर कोंडी करतात. अशा बेशिस्त वाहन चालकांविरुध्द कोळसेवाडी वाहतूक विभागाने मोटार वाहन कायद्याने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.

Landing of Manishnagar flyover is dangerous
नागपूर : मनीषनगर उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ धोकादायक
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास

हेही वाचा >>>डोंबिवलीत प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पतीचा खून; मृतदेह कसारा घाटात फेकला

शिळफाट्याकडून कल्याण दिशेने जाणाऱ्या मार्गिकेत वाहनांची कोंडी असेल तर अनेक मोटार, दुचाकी, रिक्षा, काही ट्रक चालक त्याच्या विरुध्दच्या मार्गिकेत येऊन इच्छित स्थळी जातात. यामुळे सुरळीत असलेल्या मार्गिकेत वाहन कोंडी होत होती. गेल्या दोन महिन्यापासून कोळसेवाडी वाहतूक पोलिसांनी शिळफाटा रस्त्यावरील कोंडी टाळण्यासाठी गाव हद्दीतून येणारे ३१ छेद रस्त्यांपैकी २८ छेद रस्ते शासन निर्णयाप्रमाणे बंद केले. शिळफाटा रस्त्यावर या छेद रस्त्यांमुळे कोंडी होत होती, असे वाहतूक अधिकाऱ्यांनी सांगितले. हे रस्ते बंद केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गाव हद्दीतून येणारे वाहन चालक शिळफाटा रस्त्यावर येताना वाहने आडवी टाकत असल्याने वर्दळीच्या रस्त्यावर कोंडी होत होती.

छेद रस्ते बंद केल्याने काही वाहन चालक वळसा घेऊन इच्छित स्थळी जात आहेत. काही बेशिस्त वाहन चालक उलट मार्गिकेतून येऊन जवळच्या रस्त्याने इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. असा जवळचा मार्ग शोधणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून कारवाई सुरू केली आहे.

हेही वाचा >>> ठाणे: घोडबंदर भागात रिक्षा उलटून लागलेल्या आगीत महिलेचा मृत्यू

कोंडीची ठिकाणे

जीवदानी रुग्णालय ते देसई खाडी पूल, रिव्हरवूड पार्क भागात उलट मार्गिकेतून वाहन घुसखोरीचा प्रकार सर्वाधिक आहे. अशा वाहन चालकांना मंगळवारी संध्याकाळपासून कोळसेवाडी पोलिसांनी अडवून कारवाई सुरू केली आहे. संध्याकाळी पाच ते रात्री १० वेळेत वाहतूक पोलिसांनी १६७ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. दुचाकी, चारचाकी स्वार या कारवाईत सापडले. शिळफाटा रस्त्याखालची जमीन आमच्या मालकीची आहे. आमची वाहने अडविणारे तुम्ही कोण, असे प्रश्न अनेक वाहन चालक पोलिसांनी करत आहेत. त्यामुळे वादावादीचे प्रसंग घडत आहेत.

“ शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांवर दैनंदिन कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. छेद रस्ते बंद केल्याने जवळचा रस्ता म्हणून चालक असा उलटा प्रवास करतात. त्यांनी कारवाई टाळण्यासाठी नियमित रस्त्याचा वापर करावा.”-रवींद्र क्षीरसागर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,कोळसेवाडी, कल्याण.

(शिळफाटा रस्त्यावर उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई.)