गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करुन दुचाकी, चारचाकी चालविणाऱ्या २५ हून अधिक वाहन चालकांवर कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलिसांनी मोटार वाहन कायद्याने कारवाई केली. या दुचाकी स्वारांकडून दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असा एकूण ७० हजार रूपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मद्यपान करुन वाहने चालवित असल्याचे निदर्शनास आले –

मद्यपान करुन वाहने चालवू नका, असे नियमित आवाहन करुनही वाहन चालक त्या सूचनांचे पालन करत नसल्याने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करुन वाहन चालक वाहने चालविण्याची शक्यता विचारात घेऊन कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या पथकाने कल्याण पूर्वेतील सर्वाधिक वर्दळीच्या तिसगाव नाका, मानपाडा चौक, पत्रीपूल, मलंग रोड, टाटा नाका भागात गस्त ठेवली होती. यावेळी दुचाकी स्वार, मोटार, अवजड वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. यावेळी २५ हून अधिक दुचाकी, मोटार कार चालक मद्यपान करुन वाहने चालवित असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action taken against 25 drivers who were drunk driving in kalyan msr
First published on: 29-07-2022 at 12:03 IST