लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: येथील पूर्व भागातील ग प्रभाग हद्दीतील फेरीवाल्यांवर विशेष मोहिमेंतर्गत सोमवारी आक्रमक कारवाई करण्यात आली. सोमवार बाजाराचा दिवस असल्याने ग प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाने ग प्रभाग हद्दीतील एकाही रस्त्यावर फेरीवाला बसता कामा नये असे नियोजन केले होते. तरीही काही फेरीवाले इमारतींच्या मागे लपून व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्यावर त्यांचे सामान जप्त करण्यात आले.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
External Affairs Minister S Jaishankar asserted that the two armies are fighting for supremacy on the Chinese border
चीन सीमेवर दोन्ही सैन्यांत वर्चस्वासाठी चढाओढ; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे प्रतिपादन
Politics, ED, CBI Probe and BJP
भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरू झालेले २५ नेते भाजपात, २३ जणांना थेट दिलासा!

ग प्रभागाचा साहाय्यक आयुक्त पदाचा पदभार संजय कुमावत यांनी स्वीकारला. ग प्रभाग हद्दीत एकही फेरीवाला रस्ते, पदपथ अडवून बसणार नाही असे आदेश त्यांनी फेरीवाला हटाव पथकाला दिले आहेत. गेल्या वर्षापासून फेरीवाला हटाव पथकाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे यांनी ग प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते, पदपथ अडवून बसणाऱ्या मुजोर फेरीवाल्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे बहुतांशी फेरीवाले आपली हद्द सोडून इतर हद्दीत व्यवसायासाठी गेले आहेत. मुजोर तीन फेरीवाल्यांच्या विरुध्द साळुंखे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिकेत अभ्यंगतांच्या आसन व्यवस्थेसाठी अधिकाऱ्यांच्या दालनावर गदा

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर, शिवमंदिर रस्ता, मानपाडा रस्ता, राजाची रस्ता भागात एकही फेरीवाला बसणार नाही असे नियोजन ग प्रभाग अधिकाऱ्यांनी केल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. आता ग प्रभागात साहाय्यक आयुक्त कुमावत, पथक प्रमुख साळुंखे यांनी फेरीवाल्यांच्या विरुध्द आघाडी उघडल्याने फेरीवाल्यांची दाणादाण उडाली आहे. ग प्रभागाचे यापूर साहाय्यक आयुक्त संजय साबळे यांनी आयरे प्रभाग हद्दीतील बेकायदा बांधकामे तोडण्यास टाळाटाळ केल्याने आणि अतिक्रमणांची ते पाठराखण करत असल्याच्या वाढत्या तक्रारी नागरिकांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे त्यांची तडकाफडकी उचलबांगडी पालिका मुख्यालयातील मालमत्ता विभागात करण्यात आली. पालिकेचा कचरा वाहनावरील एक वाहन चालक त्यांची बदली रोखण्यासाठी धडपडत होता.

हेही वाचा… डोंबिवलीत ३० वर्षापूर्वीच्या १७४ इमारतींना नोटिसा, संरचनात्मक परीक्षण करुन घेण्याचे आदेश

कुमावत यांनी यापूर्वी फ प्रभागात काम केले आहे. त्यामुळे त्यांना डोंबिवली पूर्वेतील फेरीवाल्यांची व्यवसाय करण्याची, लपून व्यवसाय करण्याची ठिकाणे माहिती असल्याने फेरीवाल्यांमध्ये कारवाईच्या भीतीने अस्वस्थता निर्माण झाली आहे. फ प्रभागाचे नवनियुक्त साहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनीही पूर्व भागात नियमित फेरीवाल्यांवर कारवाई करावी. ९० फुटी रस्त्यावरचा मंगळवारचा बाजार बंद करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.