मनिष सोपारकर अभिनेता, दिग्दर्शक, लेखक

navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…
non marathi mobile phone professionals
अमराठी भ्रमणध्वनी व्यावसायिकांना समज, दुरुस्ती काम न करण्याचा मनसेचा इशारा
Loksatta career article about A career in singing
चौकट मोडताना: गोड गळय़ाच्या मल्हारचे बाबा

अभिनेते मनीष सोपारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘मजार’ या नाटकाला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळाली. ‘जाणता राजा’ आणि ‘भगतसिंग वन्स मोअर’ या नाटकात ते भगतसिंग यांची भूमिका साकारत आहेत.

माझ्या आईचे माहेर ठाण्याला होते. तेव्हा सुट्टीत तिथे जाण्याचा योग येत असे. माझे आजोबा दिनकर घरत यांच्यामुळे मला वाचनाची आवड निर्माण झाली. ते मला पुस्तके आणून देत असत. लहापणीचे वाचन म्हणजे ‘चांदोबा’, ‘ठकठक’ ही पुस्तके मी एका दमात वाचून काढायचो. त्यामुळे गोष्टीची पुस्तके वाचून झाल्यावर आणखी काही वाचायला हवे म्हणून मी आजोबा आणि मामांकडे हट्ट करायचो. मग काय वर्तमानत्र किंवा जुन्या दिवाळी अंकांतूनच वाचनाची ही आवड पूर्ण करायचो. त्यामुळे लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत लागलेली वाचनाची आवड यामुळेच खऱ्या अर्थाने मी वाचनाकडे वळालो. शाळेत असताना वाचनायलातून पुस्तके आणून वाचू लागलो. त्यानंतर शाळा, महाविद्यालयीन जीवनात रंगभूमीशी जोडलो गेल्याने वाचनाचा प्रवासही त्या दिशेने सुरू झाला.

महाविद्यालयात असताना ‘नटसम्राट’ नाटकातील एक भाग अभ्यासक्रमासाठी होता. तेवढय़ाने मन रमेना. म्हणून मग वाचनालयातून ‘नटसम्राट’ आणून ते नाटक पूर्णपणे वाचले. नाटकाची आवड या पुस्तकानंतरच अधिक वाढली आणि त्यानंतर अधिक वेगाने नाटकाच्या वेडाने झपाटलो असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. त्यानंतर विविध पुस्तके वाचण्याचा योग येत गेला. असेच एकदा ‘पांडव प्रताप’ हे पुस्तक वाचनात आले आणि इतिहासाशी जवळीक वाढली. शिवाजी सावंत यांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीने तर अक्षरश: भारावून गेलो. त्यानंतर रणजित देसाई यांची ‘स्वामी’, वि. स. खांडेकरांची ‘ययाति’ भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ असे करता करता पुल, वपु यांच्या समग्र लिखाणासोबतच जीए कुलकर्णी यांचे कथासंग्रह वाचनात आले. वपु यांच्या सगळ्याच पुस्तकांचा माझ्यावर प्रभाव पडला. कारण त्यांचे लिखाण मनात नुसतं रुजत नाही, तर आपल्यालाही लिखाणाची प्रेरणा देते. पु.ल. देशपांडे, व.पु. काळे हे जरी आवडते लेखक असले तरी संजय पवार, जयंत पवार, विजय तेंडुलकर यांच्या एकांकिका आणि नाटकांनी झपाटून टाकले. अभिनय क्षेत्राशी निगडित डॉ. श्रीराम लागूंनी लिहिलेले ‘वाचिक अभिनयाचे’ हे पुस्तक माझ्यासाठी फार मोलाचे ठरले. आजही अभिनयासाठी उपयुक्त लेख वाचायला आवडतात. लहानपणी लागलेली वाचनाची आवड खूप काही देऊन गेली. पुस्तक एक समृद्ध अनुभव देते असे म्हणतात ते खरेच आहे. कारण या क्षेत्रात वावरताना हवा असलेला आत्मविश्वास याच पुस्तकांनी दिला. पुस्तकांमुळेच कदाचित माणसेही वाचायला शिकलो. अजून खूप वाचायचे आहे. मंटो यांची काही पुस्तके मी वाचली. तशी गुलजार यांची अनुवादित पुस्तकेदेखील वाचली. या पुस्तकांमुळे हिंदीकडे ओढा वाढला आहे. आता मला अधिक वेगाने हिंदी साहित्याकडे वळायचेय. वाचण्यासाठी अशी कोणती ठरावीक वेळ अथवा जागा नाही. जेव्हा जिथे वेळ मिळेल, तिथे मला वाचायला आवडते. त्यातही घराच्या गच्चीत छान कॉफी घेत वाचण्याचा आनंद काही वेगळाच आहे.

आजकाल वाचन डिजिटल होत चाललेय. बरीचशी पुस्तके पीडीएफ स्वरूपात मोबाइलवरच आहेत. ट्रेन आणि बसच्या प्रवासात ते वाचायला बरे पडते. पण पुस्तके वाचण्याची सर या डिजिटल वाचनात नाही हेही खरेच. प्रवासवर्णने आणि ऐतिहासिक पुस्तके आवडीची. पण त्याचबरोबर वैज्ञानिक पुस्तके आणि काव्यसंग्रहदेखील आवर्जून वाचतो. सध्या संजय पवार यांचे ‘चोख्याच्या पायरीवरून’ हे पुस्तक वाचतोय.

 ‘पुस्तक म्हणजे जगण्याची अनुभूती

माझ्यासाठी पुस्तके म्हणजे जगण्याची एक अनुभूती आहे. नवे काही तरी लिहिण्याची स्फूर्ती म्हणजे पुस्तके. सोशल मीडियाच्या गर्दीत मला पुस्तकात हरवायचेय. डबिंग करताना किंवा रिहर्सल करताना जसा वेळ मिळेल तसे पुस्तक वाचत असतो.