पालकमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह विधान; आगरी-कोळी समाजात नाराजी

ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अभिनेता मयूरेश कोटकर यांना रविवारी रात्री ठाणे पोलिसांनी अटक केली.  त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले असून बुधवारी याप्रकरणी आदेश काढण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेचे नगरसेवक योगेश जानकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ही अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी जोर धरत असताना कोटकर यांनी समाजमाध्यमांवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे शिवसैनिकही आक्रमक झाले होते.

दरम्यान, मयूरेशला तात्काळ सोडविण्याची मागणी आगरी-कोळी समाजातील तरुणांनी केली असून कायद्यानेच उत्तर देऊ असे तरुणांचे म्हणणे आहे. त्यामुळे विमानतळाच्या नामकरणाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी ठाणे जिल्ह्यातील आगरी-कोळी समाजाकडून करण्यात येत आहे. तर बाळासाहेब ठाकरे यांचे नाव विमानतळास देण्यास शिवसेना आग्रही आहेत. आगरी-कोळी समाजाने दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मानवी साखळी तयार केली होती. तसेच  जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे.

मयूरेश यांना अटक झाल्यानंतर लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीने पाठपुरावा सुरू करून त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले. आम्ही कायद्यानेच उत्तर देत आहोत.  – गिरीश साळगावकर,  अध्यक्ष, ठाणे शहर गावठाण कोळीवाडे पाडे संवर्धन समिती

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor mayuresh kotkar arrested akp
First published on: 16-06-2021 at 00:40 IST