अभिनेते शरद पोंक्षे यांचे परखड मत
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून आपल्याला प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुदैव काही नाही, असे परखड मत शिवसेनेचे उपनेते व अभिनेते शरद पोंक्षे यांनी येथे मांडले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीच्या समर्थनार्थ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघात स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे. यासाठी रविवारी सायंकाळी येथील आदित्य सभागृहात अभिनेते शरद पोंक्षे यांचे सावरकरांवरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना त्यांनी सावरकरांबद्दलच्या विस्तृत विवेचन केले. सावरकर हे क्रांतीकारकांची भगवतगीता होते. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते हिंदू म्हणायला तयार नाहीत. सावरकर हे प्रखर हिंदूत्त्ववादी असल्यानेच त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला नाही. सावरकरांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. डॉ. शिंदे हे यासाठी दहा लाख स’ाा गोळ्या करण्याचा संकल्प केला आहे. हे काम केवळ शिवसेनेचे नाही तर सर्व हिंदुवादी नागरिकांचे आहे. केवळ दहा लाख नाही तर एक कोटी स’ाा गोळा करुया असे आवाहन करत त्यांनी एक लाख स’ाा चित्रपट सेनेच्या माध्यमातून गोळा करण्यात येतील असेही सांगितले.