scorecardresearch

ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळवी कालवश

दूरचित्रवाणी आणि अनेक नाटकांमधून विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळवी यांचे येथे शनिवारी निधन झाले.

Vijay Salvi died dombivli
ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळवी कालवश (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

डोंबिवली- दूरचित्रवाणी आणि अनेक नाटकांमधून विनोदी भूमिका साकारणारे ज्येष्ठ रंगकर्मी विजय साळवी यांचे येथे शनिवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातू असा परिवार आहे.

हेही वाचा – कल्याण : ‘खिडकी वडा’चे संस्थापक यशवंत वझे यांचे निधन

हेही वाचा – महेश आहेर यांच्या बडतर्फीसाठी मुंब्य्रात मूकमोर्चा, कारवाई झाली नाही तर उग्र आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा

विजय साळवी अनेक वर्षे विलेपार्ले येथे वास्तव्याला होते. ते नंतर डोंबिवलीत राहण्यास आले होते. बालनाट्य, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिका, ‘मोरूची मावशी,’ ‘भ्रमाचा भोपळा’ या नाटकांमध्ये, ‘चार दिवस सासुचे’ या चित्रपटात, आभाळमाया, चिमणराव या मालिकांमध्ये विजय साळवी यांनी विनोदी भूमिका साकारल्या. ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे, विजया मेहता, विनय आपटे यांच्याबरोबर त्यांनी काम केले.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-02-2023 at 19:46 IST

संबंधित बातम्या