भाईंदर : अभिनेत्री उर्वशी ढोलकिया काशिमिरा येथे झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावली आहे. शनिवारी सकाळी एका शाळेच्या बसने तिच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात ढोलकिया या थोडक्यात बचावली आहे.
अभिनेत्री उर्वशी ढोलकिया शनिवारी सकाळी काशिमिरा येथील एका स्टुडिओमध्ये चित्रीकरणासाठी येत होती. दहिसर पथकर नाक्याच्या काही अंतर पुढे पालिकेच्या नाट्यगृहासमोरून तिची गाडी जात असताना मागून येणाऱ्या शाळेच्या बसने धडक दिली. यावेळी दोन्ही वाहन चालकांनी वेळेत गाडीवर नियंत्रण मिळवल्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना झाली नाही.
हेही वाचा – शहापूरमध्ये वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल
या अपघातात अभिनेत्री ढोलकिया थोडक्यात बचावली आहे. घडलेला प्रकार किरकोळ असला तरी त्याचे गांभीर्य लक्षात घेत उर्वशीने जवळील काशिमिरा पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली. त्यानुसार या संदर्भात अपघातची नोंद करण्यात आली असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी दिली.