कल्याण – अधिक मास सुरू झाला आहे. या महिन्याला पुरूषोत्तम, मलमास म्हटले जाते. या मासात दान, तप केल्यास चांगले फळ मिळते असे मानले जाते. यावेळी प्रथमच अधिक मासात पंच पर्वणीचा योग आला आहे. हा योग मे आणि जून महिन्यातील वेगळ्या तारखांना आला आहे. या पर्वणीच्या काळात नागरिकांनी आपल्या उत्तम शरीर प्रकृती, समाधानी जीवनासाठी विविध पध्दतीचे दान, विविध ग्रंथांचे वाचन, श्रवण करावे, असे एका ज्येष्ठ शास्त्रीय पंडिताने सांगितले.
व्यतिपात, बुधवार, २७ मे, २८ मे, व्दादशी, ३१ मे, पौर्णिमा, ७ जून, दशमी, वैधृती, ११ जून, द्वादशी, १४ आणि १५ जून अमावस्या आणि सोमती अमावस्या हे पंच पर्वणीचे अधिक मासातील योग आहेत. या पाच पर्वणीमध्ये तीर्थस्नाला भेट, दान देण्यास अधिक महत्व आहेत. ‘अधिककस्य अधिक फलम’ या उक्तीप्रमाणे या महिन्यात अधिक दान केल्यास अधिक फळ मिळते. मनाला उभारी देणारा हा महिना आहे. त्यामुळे या महिन्यात शरीर प्रकृतीप्रमाणे व्यक्ती व्रत करू शकतात, असे शास्त्राकाराने सांगितले.
अधिक मासात पाळावयाचे नियम आणि करावयाची दाने याविषयी शास्त्राकाराने सांगितले, या महिन्यात नित्य उपवास करणे, दिवसभरात एकदाच भोजन करणे, दररोज केळीच्या पानावर भोजन करणे, एकच धान्य दररोज खाणे, महिनाभर भोजनात मीठ न ठेवणे, दररोज अभ्यंग स्नान करणे, शयनासाठी कांबळी, चटईचा वापर करणे, दररोज नारळ, दीप, तांदुळ दान करणे. दररोज एक प्रहर मौन धारण करणे, पायात चप्पल न घालता चालणे, देवासमोर तेल, तुपाचा अखंड दीप लावणे, ३३ अनारसे, बत्तासे तांब्याच्या ताम्हणात ठेऊन दान देणे खूप फलदायी असते.
याशिवाय गाईची दररोज सेवा करावी. आवडीचे ग्रंथ वाचन करावे, गाईला चारा खाऊ घालावा, विष्णु सहस्त्रनामाचे दररोज वाचन करावे, भागवत कथा श्रवण करावी, भुदान, सुवर्ण दान करावे, ही अधिक मासातील महत्वाची उपासना आहे. ज्यांना नोकरी, व्यवसायानिमित्त नित्य वाचन, ध्यान धारणा जमत नाही त्यांनी दानाला महत्व द्यावे, असे ज्येष्ठ शास्त्राकाराने सांगितले.
व्यतिपात पर्वात दान केल्यास अपमृत्यु टळतो. या पर्वात सोने, तीळपात्र, तांब्याचे भांडे, नारळ, सुपारी दान केल्याने यम धर्माची कृपा होते. वैधृती पर्वात दान केल्यास विष्णुची कृपा होते. या पर्वात साखर, दुध, मध, लाडू, नारळ, विडा तांबुल १६ या प्रमाणात दान करावे. पौर्णिमा पर्वातील दानामुळे ब्रह्मदेवाची कृपा होते. या कालावधीत सुवर्ण, अनारसे, आवडती वस्तू, ब्राह्मण दांम्पत्य भोजन करावे. द्वादशी पर्वात गोग्रास, गडू भरून तुप भांडे, गोप्रदान, बत्तासे, साळ, जव, गहू, राळे, मुग, सप्तधान्य दान करावे. अमावस्येला सर्व दाने केल्याने व्रताची समाप्ती होते. पितरांची कृपा होते. या कालावधीत मागतेकरी, कष्टकरी यांना कपडे, फळे वाटावीत. ३३ मुठी कोणत्याही प्रकारचे धान्य द्यावे, असे शास्त्राकाराने सांगितल
