scorecardresearch

कल्याणमध्ये आजपासून आगरी-कोळी, मालवणी महोत्सव

२२ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती महोत्सव समितीचे संयोजक, कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी दिली.

कल्याणमध्ये आजपासून आगरी-कोळी, मालवणी महोत्सव
फडके मैदानात आगरी, कोळी महोत्सवाची तयारी.

कल्याण: आगरी-कोळी आणि मालवणी प्रतिष्ठानतर्फे शुक्रवारपासून कल्याण पश्चिमेतील लाल चौकी भागातील फडके मैदानात आगरी, कोळी आणि मालवणी महोत्सव आयोजित केला आहे. २२ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती महोत्सव समितीचे संयोजक, कोळी समाजाचे नेते देवानंद भोईर यांनी दिली.

हेही वाचा >>> ठाणे : मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी अल्पवयीन मुलीने केली घरातच चोरी

दहा दिवस चालणाऱ्या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री कपील पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील यांच्या पुढाकाराने या महोत्सवाचे आयोजन केले आहे. सन्मान वर्दीचा, ऑनलाईन फसवणुकीविषयी जनजागृती कार्यक्रम, समाज माध्यम जागृती, आगरी, कोळी, मालवणी चवीदार, स्वादिष्ट, खमंग खाद्याचे मंच, मनोरंजन असे कार्यक्रम महोत्सवात असणार आहेत.

महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपेश ढोणे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर, स्वागताध्यक्ष जयराम गुडदे, सुभाष कोळी, सचीन कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नियोजन केले आहे, असे संयोजक देवानंद भोईर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-01-2023 at 15:16 IST

संबंधित बातम्या