एड्ससारख्या भीषण आजाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण व्हावी. तसेच या रोगाचा प्रसार कसा होतो, या रोगाची लक्षणे काय आहेत याबाबत विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशाने जीवनदीप कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १ ते ७ डिसेंबरदरम्यान राष्ट्रीय सेवा विभागातर्फे एड्स जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने रांगोळी, पथनाटय़, पोस्टर मेकिंग, निबंध वेगवेगळ्या स्पर्धा महाविद्यालयातर्फे घेण्यात आल्या.

सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. वी. कोरे यांच्या हस्ते या जनजागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळीच्या माध्यमातून एड्स आजारामुळे समाजव्यवस्थेवर होणारे परिणामांचे चित्र दिसत होते. ‘एड्स आजार आणि आजचा समाज’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महाविद्यालयातील १०९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सप्ताहादरम्यान महाविद्यालयाच्या पटांगणात, गोवेली ग्रामीण रुग्णालयात, गोवेली गावातील ठाकूरपाडा येथे तसेच म्हस्कळ गावात एड्स रोगाबद्दल माहिती, आजार झाल्यावर घ्यावयाची काळजी या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाटय़ सादर केले. विद्यार्थ्यांनी गावातील महिलांशी संवाद साधून त्यांना एड्स रोगाबाबत माहीती दिल्याने या आजाराबाबत असलेले गैरसमज दूर करण्यास मदत झाली. ‘एड्स आजाराची माहिती आणि घ्यावयाची काळजी’ या विषयावर डॉ. अनिल थोरात यांचे व्याख्यान यावेळी झाले. तसेच विद्यार्थ्यांसाठी या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. एड्सवर आधारित पोस्टर मेकिंग स्पर्धाही घेण्यात आली. या वेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. पवार, प्रा. गिध उपस्थित होते.

Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
“त्याला अशी शिक्षा…”, नेहाचा खून करणाऱ्या फयाजच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
National Medical Commission, Denies Approval for New Medical Colleges, Medical Colleges and Seat Increase, 2024 2025 Academic Year, medical students, medical seats in india, medical seats
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या जागा, महाविद्यालयांमध्ये वाढ? राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने काय सांगितले?
Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’

विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा

हृषीकेश मुळे, युवा वार्ताहर
पुस्तकी अभ्यासासोबत विद्यार्थ्यांना चालू घडामोडींचे ज्ञान व्हावे, विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशाने जोशी बेडेकर महाविद्यालयातील स्कॉलर अकादमी आणि विद्यार्थी फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने प्रश्नमंजूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रश्नमंजूषा स्पर्धेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेची विभागणी तीन वेगवेगळ्या स्वरूपात करण्यात आली. प्राथमिक फेरीत सहभागी झालेल्या एकूण ४० विद्यार्थ्यांना या स्पर्धेत चालू घडामोडींवर आधारित एकूण २० प्रश्नांची लेखी स्वरूपात परीक्षा घेण्यात आली. यात क्रीडा, राजकारण, उद्योग या विषयांवर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते. यापैकी द्वितीय फेरीत आठ जणांची निवड करण्यात आली. यात दोन विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक गट तयार करण्यात आला. प्रत्येक गटाला दोन प्रश्न विचारण्यात आले. त्यानंतर एका मर्यादित वेळेत संपूर्ण चारही गटांना प्रश्न विचारण्यात आले. असा हा वेळेची मर्यादा असणारी ‘बझर फेरी’ घेण्यात आली. या फेरीतून सहा जणांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. अंतिम फेरी ही दृक्श्राव्य माध्यमावर आधारित होती. या फेरीत विद्यार्थाना जीवशास्त्र, माध्यम, उद्योगजगत या विषयावर आधारित चित्रे दाखवण्यात आली. तसेच श्राव्य प्रकारात जाहिरात, चित्रपटांतील संवाद, गाणी विद्यार्थ्यांना ऐकवण्यात आली. अचूक ओळखणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांक हृषिकेश मुळे, भक्ती जोशी, द्वितीय क्रमांक गोकुळ जाधव, तेजस धोत्रे, तृतीय क्रमांक प्रशांत कापडी, सागर कोठेकर या विद्यार्थ्यांना मिळाला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
ज्ञानसाधनात ‘युटोपिया’ची जय्यत तयारी

चैताली शिंदे, युवा वार्ताहर
महाविद्यालयातून बाहेर पडल्यावरदेखील वेगवेगळ्या चांगल्या उपक्रमांमुळे महाविद्यालयाचे नाव मोठे करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महाविद्यालयालादेखील विसर पडत नाही. महाविद्यालयीन महोत्सवात हे ‘विशेष चेहरे’ प्राध्यापकांच्या आठवणीत असतात. याच पाश्र्वभूमीवर ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाने यंदाच्या ‘युटोपिया’ महोत्सवाचे आयोजन केले आहे.
‘डॅझलिंग स्टार’ अर्थात ‘चमकते तारे’ या संकल्पनेवर आधारित ‘युटोपिया’ महोत्सव येत्या २१ आणि २२ डिसेंबर रोजी महाविद्यालयात साजरा होणार आहे. त्यात माजी विद्यार्थ्यांना महोत्सवात सहभागी करून घेतले जाणार आहे.
महाविद्यालयात असताना विविध उपक्रमांमध्ये स्वत:ला सिद्ध करणारे काही विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहेत. या माजी विद्यार्थ्यांना महोत्सवात आमंत्रित करून वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. १५ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत ज्ञानसाधना महाविद्यालयात काही नवीन संकल्पनांवर आधारित दिवस (डे) साजरे होणार आहेत.
याशिवाय टीशर्ट पेंटिंग, एगशेल पेंटिंग, नेल आर्ट, पोस्टर मेकिंग , पॉट पेंटिंग, टॅटू मेकिंग, केशभूषा, सलाड मेकिंग, मेहेंदी, ब्रायडल मेकअप आणि रांगोळी अशा स्पर्धा महोत्सवात आयोजित केल्या आहेत. ‘या महोत्सवासाठी जनसंपर्क, सुरक्षा, व्यवस्थापन अशा विद्यार्थ्यांच्या समिती नेमण्यात आल्या आहेत. विद्यार्थी महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी प्रयत्नशील आहेत,’ असे महोत्सवाचा विद्यार्थी प्रमुख सनी प्रेमांनद दुषिंग याने सांगितले.
सिनेकलाकरांच्या आठवणींना उजाळा
यंदाच्या वर्षी महाविद्यालयात ‘रेट्रो डे’ हा आगळावेगळा दिवस साजरा करण्यात येणार आहे. रेट्रो डेच्या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थी १९७०-८० च्या दशकातील सिनेकलाकारांची वेशभूषा महाविद्यालयात परिधान करून येणार आहेत. या दिवशी जुन्या चित्रपटांची गाणी, अभिनेत्यांच्या नकलांचे सादरीकरण विद्यार्थी करणार आहेत.