Airoli Katai Naka Elevated Road Update: डोंबिवली-नवी मुंबई रस्ते प्रवासातील ऐरोली काटई मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर तिसरा टप्पा प्रगतीपथावर आहे. पहिले दोन टप्पे याच वर्षी सुरु करण्याचा मानस सरकारचा आहे. तर संपूर्ण प्रकल्प २०२८ मध्ये पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती आणि प्रकल्पाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले, वाचा…

डोंबिवली शहरातून हजारो नोकरदार नवी मुंबईतील खासगी कंपन्यांत कामानिमित्ताने जात आहेत. येथील नागरिकांना शिळफाटा, कल्याणफाटा, महापे मार्गावर दररोज वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. येथून अवजड वाहनांची वाहतुकही होत असते. त्यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण होतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होते. डोंबिवली ते नवी मुंबई हे अंतर कमी व्हावे आणि नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी ऐरोली-काटई मार्गिकेच्या निर्माणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले होते. या प्रकल्पाचे एकूण तीन टप्प्यामध्ये कामे केली जाणार होती. १२.७१ किमीचा हा प्रकल्प असून पूर्णत: उन्नत प्रकल्प आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहन चालकांची प्रवासाची ३० ते ४० मिनीटांची बचत होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची कामे सुरु आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. तर पहिला टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित तिसऱ्या टप्प्याच्या कामास विलंब लागणार असला तरी पहिले दोन टप्पे याच वर्षी सुरु होतील.

पहिले दोन टप्पे याचवर्षी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा काॅरिडाॅर केवळ रस्ते प्रकल्प नसून महाराष्ट्राच्या भविष्यासाठीची धोरणात्मक गुंतवणूक आहे. दोन्ही टप्पे म्हणजेच, टप्पा १ आणि टप्पा २ पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असून वाहतुकीसाठी यावर्षीच सुरू करण्यात येतील. या प्रकल्पामुळे प्रमुख विकास केंद्रांदरम्यान वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत होऊन आर्थिक उपक्रमांना चालना मिळेल. लॉजिस्टिक्स सुधारेल आणि नागरिकांच्या जीवनमानात लक्षणीय सुधारणा होईल. मुंबई 3.0 च्या दृष्टीकोनाकडे वाटचाल करताना, अशा प्रकल्पांमुळे मुख्य शहरावरील ताण कमी होईल, नव्या शहरी कॉरिडॉरचा विकास होईल आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात संतुलित व शाश्वत विकास साध्य होईल.

३५ ते ४० मिनीटांची बचत – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया देताना हा प्रकल्प ठाणे आणि नवी मुंबईसाठी मोठा कनेक्टिव्हिटी बूस्टर ठरणार आहे. विशेषतः बोगद्यामुळे दोन्ही भागांदरम्यान अधिक जलद व अखंड प्रवास शक्य होईल. एमएमआरडीएचे ध्येय मुंबई महानगर प्रदेश अधिक राहण्यायोग्य बनवणे आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन सुलभ करणे हे आहे. कोंडी कमी करून आणि विकास केंद्रांदरम्यान अखंड संपर्क निर्माण करून आम्ही केवळ प्रवास वेगवान करत नाही, तर प्रदेशाच्या वाढत्या आर्थिक क्षमतेलाही बळ देत आहोत.या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ ३५ ते ४० मिनिटांनी कमी होणार असल्याचेही ते म्हणाले.

मुंबई इन मिनिट्स – संजय मुखर्जी

मेट्रो प्रकल्प असो किंवा रस्ते पायाभूत सुविधा, आमचा दृष्टिकोन स्पष्ट आहे, संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहण्याऐवजी आम्ही प्रकल्प टप्याटप्याने सुरू करत आहोत. यामुळे पूर्ण झालेली पायाभूत सुविधा नागरिकांना शक्य तितक्या लवकर उपयोगासाठी उपलब्ध होते आणि त्याना लाभ लवकर मिळू शकतो ऐरोली–कटाई नाका कॉरिडॉर मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार आहे. प्रमुख शहरी केंद्रांना जोडणारा हा हाय-स्पीड मार्ग नागरिकांसाठी तसेच मालवाहतुकीसाठी अधिक कार्यक्षम आणि सुलभ ठरेल.पूर्ण कॉरिडॉर कार्यान्वित झाल्यानंतर ‘मुंबई इन मिनिट्स’ ही संकल्पना नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवता येईल. शीळफाटा सारख्या ३६५ दिवस, २४x७, वाहतूक कोंडी असलेल्या व्यस्त जंक्शनवर लक्षणीय फरक दिसून येईल, ज्यामुळे प्रवास अधिक सुलभ, जलद आणि नागरिकांसाठी खूपच आरामदायी होईल असे एमएमआरडीएचे आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी म्हणाले.

प्रकल्पाची सद्यस्थिती

सुमारे १२.७१ किमी – संरचना : ३ ३ लेन कॅरेजवे

बोगदा : दुहेरी बोगदा ( तिहेरी ३ वाहतूक लेन १ आपत्कालीन मार्ग)

बोगदा तंत्रज्ञान : एनएटीएम (न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड – ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग), जटिल भूगर्भीय परिस्थितीसाठी उपयुक्त

बोगद्यामधील सुविधा – बोगदा वायुवीजन प्रणाली – बोगदा अग्निशमन प्रणाली – उच्च-दाब वॉटर मिस्ट प्रणाली – व्हेरेबल मेसेज सायनेज (VMS)

टप्पा एक : बोगदा आणि उन्नत मार्ग (ठाणे–बेलापूर रोड) हा टप्पा कॉरिडॉरचा मुख्य आधार असून ऐरोली आणि राष्ट्रीय महामार्ग-४ला मुंब्रा येथे थेट जोडतो.

एकूण लांबी : ३.४३ किमी.

दुहेरी बोगदा : – लांबी : १.६९ किमी.

रुंदी : १७.५० मीटर

स्थिती : ९२% पूर्ण

उन्नत मार्ग : – लांबी : ०.९४ किमी – संरचना : ३ ३ लेन – बोगद्याबरोबरच कार्यान्वित केला जाईल. तसेच प्रकाश, वायुवीजन आणि अग्निशमन यांसारख्या महत्त्वाच्या प्रणालींची बसवणी अंतिम टप्प्यात असून या नागरी कामांनंतर लवकरच पूर्ण होईल. या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा आणि कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टळणार आहे.

टप्पा २ : उन्नत मार्ग (ऐरोली ते ठाणे–बेलापूर रोड) – लांबी : २.५७ किमी. – मुख्य व्हायाडक्ट : ३ ३ मार्गिका

रॅम्प्स : ऐरोली–मुलुंड रोडवर ३-मार्गिका

प्रगती : १००% पूर्ण

टप्पा ३ : राष्ट्रीय महामार्ग ४ ते कटाई नाका (कल्याण–शिळ रोड ) – लांबी : सुमारे ६.७१ किमी (पूर्णपणे उन्नत मार्ग) – मुख्य व्हायाडक्ट : ३ ३ लेन – सेवा रस्ते : दोन्ही बाजूंना २ २ लेन – प्रगती : सुमारे १०% – दोन ठिकाणी अप व डाउन रॅम्प्स – पूर्णता लक्ष्य : ऑक्टोबर २०२८ हा अंतिम टप्पा राष्ट्रीय महामार्ग ४ पासून कटाई नाका पर्यंत विस्तार करत संपूर्ण प्रादेशिक संपर्क साखळी पूर्ण करेल.