ठाणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करणाऱ्या बॅनरने संपूर्ण ठाणे शहर झाकोळून गेले असतानाच, भाजपचे आमदार संजय केळकर यांनी मात्र वाढदिवसाचे बॅनर लावू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. बॅनरबाजी करण्याऐवजी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे.

राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच निवड झाली. या दोन्ही नेत्यांचे अभिनंदन करणारे बॅनर संपूर्ण शहरात जागोजागी लागले आहेत. यामुळे संपूर्ण शहर बॅनरने झोकाळून गेले आहे. असे असतानाच भाजप आमदार संजय केळकर यांनी मात्र वाढदिवसाचे बॅनर लावू नका असे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

sharad pawar
‘गोविंदबागे’त जेवायला या! शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना स्नेहभोजनाचे आमंत्रण!
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
cbi summoned akhilesh yadav in illegal mining case in uttar pradesh
अवैध खाण प्रकरण: अखिलेश यादव यांना सीबीआयचे समन्स, गुरुवारी हजर राहण्याचे निर्देश
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध

आमदार केळकर यांचा ९ जुलैला वाढदिवस आहे. त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरात लागण्यास सुरुवात झाली असतानाच आमदार केळकर यांनी मात्र वाढदिवसाची बॅनरबाजी नको अशा सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. वाढदिवसानिमित्त कोणतेही शुभेच्छांचे होर्डिंग, बॅनर लावू नये, जाहिरात करू नये. आपले निस्सीम प्रेम हेच माझ्यासाठी मौल्यवान शुभेच्छा आहेत. शिवाय जाहिरात ऐवजी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्यास किंवा गरजवंतास मदतीचा हात दिल्यास माझ्यासाठी त्या शुभेच्छाच असतील,असेही त्यांनी म्हटले आहे.