मुसळधार पावसामुळे राज्यमार्गावर एक फुटापर्यंत पाणी, वाहतूक विस्कळीत
कल्याण आणि बदलापूर या शहरांना जोडणारा राज्यमार्ग पुन्हा एकदा तुंबला. शुक्रवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे या राज्यमार्गावरील अंबरनाथ शहरातील पश्चिमेचा मोठा भाग पाण्याखाली गेला. या राज्यमार्गावर असलेल्या ग्लोब बिजनेस पार्क ते विमको नाका या परिसरात एक फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला.

कल्याण बदलापूर राज्यमार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. कल्याण, उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरातून हा राज्यमार्ग जातो. कल्याणसारखे तालुक्याचे ठिकाण, उल्हासनगरसारखे व्यापारी शहर, अंबरनाथ सारखे औद्योगिक शहर आणि बदलापूर या मार्गाने जोडले जाते. याच मार्गावरून मुरबाड आणि कर्जतला जाणे सोयीचे ठरते. या राज्यमार्गाची उभारणी गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. हा राज्यमार्ग सहा पदरी केला जातो आहे. बहुतांश भागात या राज्य मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था या राज्यावर मार्गावर उभारण्यात आली नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे पाणी साचते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस झाला. काही मिनिट पडलेल्या या पावसामुळे कल्याण बदलापूर राज्य मार्गावर पुन्हा एकदा पाणी साचले. अंबरनाथहून बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर ग्लोब बिजनेस पार्क ते विमको नाका या भागात सुमारे एक फुटापर्यंत पाणी साचले होते.

An advertisement board fell down in Wagholi due to strong winds Pune news
सोसाट्याचा वाऱ्यामुळे वाघोलीत कोसळला जाहिरात फलक
thane traffic jam, ghodbunder traffic jam,
ठाणे: कापूरबावडी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीमुळे घोडबंदर ठप्प
Ten bridge
राज्य मार्गावरील टेन पुलाचा कठडा बनला धोकादायक, दुरुस्ती कामासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागणार
heavy traffic on manor wada bhiwandi state highway closed due to crack in bridge near manor
पालघर: मनोर वाडा अवजड वाहतूक बंद; टेन जवळील पुलाच्या सुरक्षिततेबद्दल शंका

या पाण्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. मोठी वाहने सहजरित्या पाण्यातून निघत होती. मात्र दुचाकी, लहान चार चाकी आणि रिक्षा चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. अनेक दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये पाणी शिरल्याने दुचाकी बंद पडल्या. रिक्षांच्या बाबतही हीच समस्या निर्माण झाली. त्यामुळे स्वतः प्रवाशांना उतरून रिक्षाला धक्का मारण्याची वेळ आली होती. अर्धा तासापर्यंत या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. रस्ता निर्मिती करताना पाण्याचा निचरा होईल अशी प्रभावी व्यवस्था असणे आवश्यक होते. मात्र ही व्यवस्था प्रभावी न झाल्याने राज्य मार्गावर पाणी तुंबल्याचा आरोप होतो आहे. सोबतच अंबरनाथ नगरपालिकेतर्फे केल्या गेलेल्या नालेसफाईवरही यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.