scorecardresearch

Premium

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेही घरच्या घरी विसर्जन शक्य, अंबरनाथ पालिकेच्या मदतीने रोटरी क्लबचा नवा प्रयोग

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती अमोनियम बायकार्बोनेट (NH4H CO3) च्या द्रावणात विसर्जित केल्यानंतर ती विरघळते आणि उरलेला गाळ अर्थात कॅल्शियम सल्फेट (NH4 2SO4) या नावाचे अतिशय उत्कृष्ट खत तयार होते.

plaster of paris ganesh idols, ambernath municipal council
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचेही घरच्या घरी विसर्जन शक्य, अंबरनाथ पालिकेच्या मदतीने रोटरी क्लबचा नवा प्रयोग (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अंबरनाथ : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे जलस्त्रोत प्रदुषित होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय अनेकदा घेतला गेला. परंतु प्रदुषण रोखण्यासाठी या मूर्तींचे विसर्जन आणि विघटन करण्याचा प्रयोग अंबरनाथमध्ये राबवला जातो आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या मदतीने रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थने प्रायोगिक तत्वावर याबाबत जनजागृती सुरू केली असून अनंत चतुर्दशीच्या दिवशी त्याचे प्रात्याक्षिकही केले जाणार आहे. गेल्या काही वर्षात शाडू मातीच्या मूर्तीचे प्रमाण वाढले असले तरी स्वस्त आणि आयत्या वेळी उपलब्ध होणाऱ्या मूर्तींमुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आजही मोठ्या प्रमाणावर पुजेसाठी घेतल्या जातात.

गणेशोत्सवादरम्यान हजारो प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती तयार होतात. त्यात लहान मूर्तींचे प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक असते. या मूर्ती साध्या पाण्यात विरघळत नाहीत. या मूर्तीचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने खाडीमध्ये विसर्जन केले जाते. यामुळे खाडीतील जलचर प्रभावित होतात. राष्ट्रीय हरित लवदाने २०१५ या वर्षात नगरपालिका, महानगरपालिकांना मूर्ती विसर्जनामुळे होणारे नदी प्रदूषण टाळण्याचे निर्देश दिले होते.

showed the horoscope and asked how to convince an angry girlfriend they made jyotish unconscious and took away all the belongings from the house in kanpur
“रागावलेल्या प्रेयसीची समजूत काढण्याचा मार्ग सांगा” कुंडली दाखवण्याच्या बहाण्याने आले अन् ज्योतिषालाच लुटून गेले
9th edition, World of Concrete India (WIKI), october, mumbai, concrete industry,
बांधकाम उद्योगाला आकार देण्यात ‘एआय’च्या भूमिकेवर श्वेतपत्रिका, ऑक्टोबरमध्ये होत असलेल्या ‘काँक्रीट शो’मध्ये अनावरण
police conducted raid on edible oil factory
नागपूर: खाद्य तेलाच्या कारखान्यावर पोलिसांचा ‘नाट्यपूर्ण’ छापा, काय आहे प्रकरण जाणून घ्या…
Rapper Drake Shares Photo With Bra Of Different Cup Sizes And Colors Thrown At Him at Concerts Fans Call Him Bra King
प्रसिद्ध रॅपरवर महिलांनी शोमध्ये इतक्या ‘ब्रा’ फेकल्या की पाहून व्हाल थक्क; पोज करत म्हणाला, “मी कोण आहे..”

हेही वाचा : कल्याणमध्ये ओळखीच्या इसमाकडून व्यावसायिकाची फसवणूक

पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) शास्त्रज्ञांनी यावर पर्यावरणपूरक उपाय शोधला. मात्र त्याचा तितकासा प्रभावी वापर झाला नाही. यात कॅल्शियम सल्फेट (CaSO4) म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती अमोनियम बायकार्बोनेट (NH4H CO3) च्या द्रावणात विसर्जित केल्यानंतर ती विरघळते आणि उरलेला गाळ अर्थात कॅल्शियम सल्फेट (NH4 2SO4) या नावाचे अतिशय उत्कृष्ट खत तयार होते. ते खत शेतीसाठी वापरू शकतो, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थचे तांत्रिक आणि प्रकल्प सल्लागार राजेश भावसार यांनी दिली.

हेही वाचा : कल्याणमध्ये खेळाच्या मैदानावरील बेकायदा बांधकामावर कारवाई

हाच प्रयोग अंबरनाथमध्ये राबवण्यात येणार असून त्यासाठी जनजागृती केली जाणार असल्याचे भावसार यांनी सांगितले आहे. सध्या नागरिकांना या पर्यायाची माहिती दिली जात असून त्यासाठी आवश्यक साहित्यही निम्म्या किमतीत पुरवले जाते आहे. पालिकेच्या सहकार्याने शिवगंगा नगर येथे अनंत चतुर्दशीच्या दिवशी याचे प्रात्याक्षिकही दाखवले जाणार असल्याचे भावसार यांनी सांगितले.

हेही वाचा : पावसाच्या धारात घामाच्याही धारा! ऊन पावसाचा लपंडाव, गणेशभक्तांची तारांबळ

मोफत मार्गदर्शन

पीओपीच्या गणेशमुर्तीचे घरच्या घरीच विसर्जन करता येऊ शकते. अमोनियम बायकार्बोनेट खाण्याच्या सोड्यासारखाच सौम्य असून हाताळताना हातांना कुठल्याही प्रकारची इजा होत नाही. याद्वारे मुर्तीचे विसर्जन कसे करावे, याचे विनामूल्य मार्गदर्शन रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थच्या वतीने दिले जात आहे. त्यासाठी ९८२२२८६५३० या क्रमांकावर संपर्क साधावा. घरी हा प्रयोग राबवल्यास ४८ तासात मुर्तीचे विघटन होते. साधारणपणे १० किलो वजनाच्या मुर्तीतून ५ ते ६ किलोचे खत मिळू शकते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ambernath municipal council plaster of paris ganesh idols immersed at home rotary club initiative css

First published on: 21-09-2023 at 16:02 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×