अंबरनाथ येथे रिक्षा आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यु

अंबरनाथ एमआयडीसी रोडवर एका भरघाव  वेगात असलेल्या गाडीने रिक्षाला जोरात धडक दिली.

ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ मधील पालेगाव या ठिकाणी रिक्षा  आणि चारचाकी गाडीचा भीषण अपघात झाला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. व या आपघातात चार जणांचा जागीच मृत्यु झाल्याचे माहीती समोर येत आहे.

अंबरनाथ एमआयडीसी रोडवर एका भरघाव  वेगात असलेल्या गाडीने रिक्षाला जोरात धडक दिली. या धडकीत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. व जखमीना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शिवाजी नगर पोलिस घटना स्थळी दाखल झाले असून.  हे सर्व जण उल्हासनगर येथील असल्याचे  माहीती पोलिसांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ambernath rickshaw and four wheeler accident four killed akp

ताज्या बातम्या