राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान; वैयक्तिक शौचालय बांधणीत आघाडी
केंद्र सरकारसाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या स्वच्छ भारत अभियानात अंबरनाथ नगरपरिषदेने राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत हागणदारीमुक्त आणि वैयक्तिक शौचालय बांधणीत अंबरनाथ नगरपरिषदेने बाजी मारली आहे. पहिल्या टप्प्यात १२४७ शौचालयांच्या बांधणीतून नगरपरिषद राज्यातील नगर परिषदांमध्ये अग्रस्थानी आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारी मुक्त शहरांच्या निर्मितीसाठी वैयक्तिक शौचालये बांधण्याची योजना आखण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र मोहिमेंतर्गत अशाच स्वरूपाची योजना हाती घेण्यात आली आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि महापालिकांमध्ये या योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी असा आग्रह धरण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अंबरनाथ नगरपरिषदेने स्वच्छ भारत अभियानाची शहरात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या योजनेची अंमलबजावणी करताना अंबरनाथ नगरपरिषदेने ठरवलेल्या ११५५ शौचालयांच्या निर्मितीचे उद्दिष्ट पार करत असताना पहिल्या टप्प्यात १२४७ शौचालये उभारली. त्यामुळे राज्यात उद्दिष्टांपेक्षा अधिक शौचालये बांधून अग्रस्थानी येण्याचा मान मिळवला आहे. दिल्ली येथे नुकताच पार पडलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात आलेल्या कार्यक्रमात केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू यांनी ही योजना प्रभावीपणे राबविणाऱ्यांचे कौतुक केले. त्यात अंबरनाथ नगरपरिषदेचे आणि अधिकाऱ्यांचेही कौतुक करण्यात आले, तसेच कमी वेळेत आणि प्रभावीपणे केलेल्या कामाचा आदर्शही इतर शहरांसमोर यावेळी ठेवला.

या योजनेसाठी पूर्वी वेगळे लक्ष निर्धारित करण्यात आले होते. मात्र नगरपरिषदेने घेतलेल्या पुढाकाराने नागरिकांना शौचालय उभारणीच्या लाभासाठी प्रोत्साहित करण्यात आले. त्यासाठी लागणाऱ्या अनुदानासही तात्काळ मंजुरी मिळाल्याने नागरिकांनीही मोठय़ा प्रमाणात या योजनेत सहभाग नोंदवला. त्यामुळे अंबरनाथ नगरपरिषद निर्धारित ध्येयापेक्षा अधिक कार्य करू शकली. पुढील टप्प्यात आणखी काही शौचालये बांधण्याचा अंबरनाथ परिषदेचा मानस असून त्यात ३९०० वैयक्तिक शौचालये बांधली जातील. यामध्ये ई-स्वच्छतागृहांचा अधिक भरणा असेल.
– गणेश देशमुख, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगर परिषद.

Rare Maldhok Bird Chick Born at Conservation Breeding Center in Rajasthan
गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Mata Mahakali Yatra in Chandrapur to Commence on 14 April
१४ एप्रिलपासून माता महाकालीच्या यात्रेला सुरूवात; एक महिना चालणार यात्रा, तयारी पूर्ण
Buldhana, lok saba constituency, Congress, Office Bearers, Resign, second group of members, Disagree, decision,
बुलढाणा काँग्रेसला देण्याची मागणी योग्य, पण…