scorecardresearch

ठाणे : संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

शिंदे गटाच्या पदाधिकारी मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Noncognizable offence Sanjay Raut
संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या पदाधिकारी मिनाक्षी शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा – ठाणे : बारावीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात, १७३ परीक्षा केंद्रांवर १ लाख ४ हजार ५६१ विद्यार्थी देणार परीक्षा

हेही वाचा – ठाणे : निकृष्ट दर्जाचे काम करणे भोवले, आयुक्तांनी कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यानंतर संजय राऊत यांच्याविरोधात शिंदे गटाकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. सोमवारी शिंदे गटाच्या पदाधिकारी मिनाक्षी शिंदे यांनी संजय राऊत यांच्याविरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-02-2023 at 19:37 IST
ताज्या बातम्या