ठाणे जिल्ह्यात आणखी १,५०३ रुग्ण, ३५ मृत्यू

जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या १ हजार ६८९ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

जिल्ह्य़ात मंगळवारी करोनाचे  १ हजार ५०३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची एकुण संख्या ५८ हजार ५०७ इतकी झाली आहे. तर, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या १ हजार ६८९ वर पोहोचली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी १ हजार ५०३ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये ठाणे शहरातील ३४४,  कल्याण-डोंबिवली शहरातील ३३६, नवी मुंबईतील २३९, उल्हासनगरमधील १९३, ठाणे ग्रामीणमधील १६४, मीरा-भाईंदरमधील १०५, अंबरनाथमधील ४९, बदलापूर शहरातील ४७ आणि भिवंडीतील २६ रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी जिल्ह्य़ात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील ९, कल्याण डोंबिवलीतील ९, मीरा-भाईंदरमधील ८, नवी मुंबईतील ५, ठाणे ग्रामीणमधील २ तर भिवंडी आणि अंबरनाथमधील प्रत्येकी एकारुग्णाचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Another 1503 patients and 35 deaths in thane district