ठाणे : दीड वर्षांत तिप्पट परतावा देतो असे सांगून एक हजारहून अधिक गुंतवणूकदारांची आभासी चलनाद्वारे शेकडो कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आणखी एकाला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. सेवाराम जैसानी अशी अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा >>> रामदास कदम बेईमान; खासदार राजन विचारे यांची टीका

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील वडवली गावात १५ लाखाचा गुटखा जप्त

काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने भाग भांडवल बाजारात दीड वर्षांमध्ये तिप्पट परताव्याचे अमीष दाखवून गुंतवणूकदारांची आभासी चलनाद्वारे फसवणूक केली होती. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी महाकाली ग्रुप ऑफ कंपनीचा रितेश पांचाळ याला ठाणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. त्यानंतर मंगळवारी सेवाराम जैसानी याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी ठाणे पोलिसांकडे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.