ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नीस योग्य वागणूक दिली नाही म्हणून सुप्रसिद्ध प्रशांत कॉर्नर या मिठाईच्या दुकानावर पालिकेने कारवाई केल्याचा संदेश समाजमाध्यमांवर प्रसारित केल्याप्रकरणी धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांना नौपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ‘प्रशांत कॉर्नर’च्या मालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. दरम्यान पालिकेनेही जया यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. जया यांना ठाणे न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

ठाणे येथील पाचपाखाडी परिसरात असलेल्या प्रशांत कॉर्नर दुकानाच्या बाहेरील भागात एक कट्टा बांधण्यात आला होता. तसेच शेड उभारण्यात आली होती. हा कट्टा आणि शेड बेकायदा असल्याचे सांगत ठाणे महापालिकेच्या पथकाने त्यावर कारवाई केली होती. गेली अनेक वर्षांपासून असलेल्या या कट्टय़ावर अचानक कारवाई झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत असतानाच धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी अजय जया यांनी मुख्यमंत्र्यांचे पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला होता. यावरून शहरात चर्चा सुरू झाली असतानाच ‘प्रशांत कॉर्नर’चे मालक प्रशांत सकपाळ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

‘अजय यांनी केलेले आरोप निराधार असून अशी कोणतीही घटना घडलेली नाही. महापालिका स्तरावर झालेली कारवाई आमच्यासह अन्य दुकानांवरही झाली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्या आमच्या दुकानात कधीही आलेल्या नाहीत. माझ्या नावाचा आधार घेऊन या प्रकरणाशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबाचे नाव जोडून त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे’, असे सकपाळ यांनी म्हटले. सकपाळ यांच्या तक्रारीनंतरच नौपाडा पोलिसांनी अजय जया यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

वृषाली शिंदे यांच्यावर आरोप काय?

प्रशांत कॉर्नर या दुकानामध्ये वृषाली शिंदे या खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी दुकानाबाहेर व्यवस्थित वाहन उभे केले नव्हते. यावरून दुकानाच्या सुरक्षारक्षकाशी त्यांच्या वाहनाच्या चालकाचा वाद झाला. दुकानात टोकन घेऊन खरेदी करण्यावरूनही त्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबर वाद झाला व त्यानंतर त्या खरेदी न करताच तेथून निघून गेल्या. त्यानंतर ठाणे महापालिकेने ‘प्रशांत कार्नर’ दुकानावर कारवाई केली, असा आरोप जया यांनी केला होता.

प्रशांत कॉर्नर दुकानावरील कारवाईच्या घटनेशी वृषाली यांचा संबंध जोडून समाजमाध्यमांवर खोटे संदेश प्रसारित करून शिंदे कुटुंबियांची नाहक बदनामी करण्यात आली. संजय राऊत यांच्या सांगण्यावरून ही मंडळी अशाप्रकारचे राजकारण करीत आहेत. यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीड वर्षांच्या नातवाला राजकीय वादात ओढले होते. – नरेश म्हस्के, महाराष्ट्र प्रदेश समन्वयक, शिवसेना (शिंदे गट)