ठाणे: कळवा येथे राहणाऱ्या एका घटस्फोटित महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्या समवेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेऊन तसेच  तिची १३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. या प्रकरणी कळवा पोलिसांनी रुपेश यशवंतराव (४२) याला अटक केली आहे. रुपेश याच्यावर अशाच पद्धतीचे काही गुन्हे यापूर्वीही दाखल  असल्याचे तपासातून समोर आले आहे. तर रुपेश याने अशा पद्धतीने  किती महिलांची फसवणूक केली आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.

कळवा येथे एक घटस्फोटित महिला राहते. या महिलेशी रुपेश याने २०१८ साली लग्न जुळविणाऱ्या एका मोबाईलवरून ॲप्लिकेशनच्या मदतीने  ओळख केली. यांनतर त्याने महिलेला प्रत्यक्ष भेटण्यास सुरवात केली. या भेटीनंतर रुपेश याने या महिलेशी शारीरिक संबंध प्रथापित केले. तर रुपेश याने हे शारीरिक संबंध जबरदस्तीने केले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हंटले आहे. याबरोबरच त्याने संबंधित  महिलेकडून वेळोवेळी विविध कारण सांगत तब्बल १३ लाख ६० हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे समजले असता महिलेनं कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. या तपासादरम्यान आरोपी हा त्याची खरी ओळख लपवून विविध महिलांवर अत्याचार करून त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे तपासातून समोर आले. पोलिसांनी  आरोपीच्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे आणि गोपनीय माहितीद्वारे  गुरुवारी त्याला अटक केली. त्याच्या चौकशी दरम्यान तो लग्न जुळविणाऱ्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या मदतीने घटस्फोटित महिलांना संपर्क करून त्यांना स्वतःचे लग्न झालेले असताना देखील घटस्फोटित असल्याचे सांगून त्यांच्यावर अत्याचार आणि आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले. या प्रकरणी त्याच्यावर याआधी कोनगाव, कोपरखैरणे, नवी मुंबई येथील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. रुपेश याने याच पद्धतीने अनेक  महिलांची फसवणूक केली असल्याची दाट  शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Nagpur Police, 11 Robbers, Three Crore Rupee Jewelry Heist, robbery in nagpur, nagpur robbery, crime in nagpur, one woman hostage by robbers,
एकटी राहणारी महिला; तीन कोटींच्या दागिन्यांची लूट, हजार सीसीटीव्ही…
Loksatta Chaturang Working women Responsibility of the child job
इतिश्री: चिमूटभर कमी…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’