वाडवळांचा पूर्वइतिहास- भाग १ 

दिशा खातू  dishakhatu4@gmail.com

loksabha election 2024 Peoples issues banished from campaigning in Vidarbha
विदर्भात जनसामान्यांचे प्रश्न प्रचारातून हद्दपार
Muslim League, Hindu Mahasabha, coalition government, pre independence alliance
मुस्लीम लीग आणि हिंदू महासभेने मिळून स्थापली होती प्रांतिक सरकारे… स्वातंत्र्यपूर्व काळातील आघाडीबद्दल इतिहास काय सांगतो?
Katchatheevu island controversy
विश्लेषण: कच्चथीवू बेटावर ‘या’ हिंदू राजांनी केले होते राज्य? त्यांचा रामाशी नेमका संबंध काय होता?
history of bhang on holi
होळीच्या दिवशी भांग पिण्याला आहे विशेष धार्मिक महत्त्व; जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा

वसईला यापूर्वी सात नावे होती. मात्र या बेटाला साष्टी प्रांत म्हणून ओळखले जात होते. याचा उल्लेख अनेक शासकीय स्थलवर्णन कोशांत तसेच राजपत्रात दिसून येतो. कोकणातला उत्तरेकडचा भाग म्हणून उत्तर कोकण आणि तेथे असलेली ६६ गावे म्हणजे सासष्टी असे स्थानिकांकडून म्हटले जात होते. या शब्दाचे अपभ्रंश रूप म्हणजेच साष्टी होय. पुढे याच नावाचा वापर या बेटाचा उल्लेख करण्यासाठी १३४३ मध्ये शिलाहारांच्या साम्राज्यात वापरल्याचे आढळते. नंतरच्या काळात मात्र या नावाचा वापर थेट पोर्तुगीज आणि इंग्रजांकडून झाला. पण त्यांनी याचे नाव ‘साल्सेट आयलंड’ म्हणजेच बेट असे केले. इंग्रज अधिकाऱ्यांनी मुंबईत बस्तान बसविल्यानंतर मुंबईचा पुढचा म्हणून ग्रेटर मुंबई असाही उल्लेख केला आहे. या ६६ गावांमध्ये आताच्या बोरिवलीतल्या आय.सी. कॉलनी, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, मीरा-भाईंदर, घोडबंदर, ठाणे हा भागही येत होता, ही माहिती एम. आर. कान्तक लिखित ‘द फर्स्ट अँग्लो मराठा वॉर’ या पुस्तकातून दिली आहे.

इतिहासातले समृद्ध, प्रगत प्रदेशांची पुढे निशाणी ही फक्त अवशेषांमधूनच राहत असल्याचे दिसते. वसईचेही तसेच झाले. आज मुंबईच्या शेजारचे शहर किंवा मुंबईमुळे प्रगती करणारे शहर अशी ओळख बनली आहे. हे खरे असले तरी वसईत गेल्यावर मात्र तिच्या समृद्धीचे अवशेष पाहिल्यावर गैरसमज दूर होतो.

उत्तर कोकणातल्या साष्टी प्रांतात पश्चिमेला अथांग पसरलेला समुद्र, पूर्वेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा, उत्तरेला वैतरणा नदी, दक्षिणेला भाईंदरची खाडी आणि निसर्गसौंदर्याने वेढलेला प्रदेश. या ऐतिहासिक पाश्र्वभूमी असलेल्या प्रांतात अनेक समाजांचे लोक शेकडो वर्षांपासून वास्तव्यास आहेत. असाच एक समाज म्हणजे वाडवळ. मात्र या समाजाचे मूळ नाव सोमवंशी क्षत्रिय असे आहे. जे उत्तर कोकणात १०६० सालापासून असल्याचे समजते. मुंबईच्या जन्मावर लिहिलेल्या पुस्तकांतही या समाजाचा उल्लेख आढळून येतो. हा समाज वसईला धारवाड प्रांतातील पालनपूर संस्थानात आला. पुढे संस्थानिकाचे प्रताप बिंब यांनी मुंबई, ठाणे, पालघर जिंकले आणि माहिमला राजधानी बनवली. वाळकेश्वरच्या इतिहासात बिंब राजाचा उल्लेख आढळतो.

मुंबईत वसाहत निर्माण करण्यासाठी त्यांनी सोबत ६६ कुळांमधली व्यक्ती आणल्या होत्या. त्यांनी इथल्या विविध भागांत वसाहती वसवल्या. त्यामध्ये इतर समाजांसह सोमवंशी क्षत्रिय समाज मोठय़ा प्रमाणात होता. हा समाज मुख्यत्त्वे पालघर जिल्ह्यात तसेच मुंबई उपनगरात वसला.  सोमवंशी क्षत्रिय वर्गाला ‘पंच-कळशी’ आणि ‘चौ-कळशी’ अशी नावे पडलेली आहेत. ज्यास आता ‘पाच कळशी’ आणि ‘चार कळशी’ असे म्हटले जाते. ही नावे लग्नातील एका विधीवरून पडलेली आहेत. वराची वरात ही सिंहासनावरून काढली जाते. सिंहासनाच्या चार कोपऱ्यांत आणि एक मध्यभागी कलश मांडले जातात त्यांना पंच-कळशी. जे चार कलश मांडतात त्यांना चौ-कळशी संबोधतात, असे अरविंद कोल्हे सांगतात.

आज हा समाज पालघर जिल्ह्यातील मूळ रहिवासी म्हणून ओळखला जातो. डहाणू, वसई तालुक्यांत हा समाज प्रामुख्याने आढळतो. येथे वास्तव्यास आल्यानंतर या समाजाने नांगर हातात घेतला, म्हणजेच लोकांनी शेती हा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात स्वीकारला. मग ते बागायती शेतीकडे वळले. अनेक शतके शेती-वाडीत काम केल्यामुळे यांना ‘वाडीवाला समाज’ म्हणून ओळखले जाऊ  लागले. पुढे अपभ्रंश होऊन वाडवळ असे नाव या समाजाला मिळाले आणि ते प्रचलितही झाले. हा समाज १००% साक्षर आहे. समाजाची लोकसंख्या साधारणत: ५० ते ५५ हजार इतकी आहे. या समाजाला अनेक नावांनी ओळखले जाते. पण अनेकदा आडनावे हीदेखील समाजाची ओळख बनतात. पाटील, राऊत, चौधरी, वर्तक, चुरी, सावे, चोरघे, म्हात्रे, मंत्री, कुडू, रॉय, घरत, कवळी इत्यादी सोमवंशी क्षत्रिय समाजातील काही प्रमुख आडनावे आहेत.

पुर्वी मुख्यत्वे भाताची शेती केली जात होती. तसेच या भागात पूर्वी उसाचे उत्पन्नदेखील घेतले जात होते. ब्रिटिशांच्या काळात सुपारी आणि विडय़ाच्या पानांच्या लागवडीचे प्रमाण वाढले. या भागातील पानाला भरपूर ठिकाणाहून मागणी होती. रेल्वेने देशात, पाकिस्तान या पानांची निर्यात केली जात होती. पानाची लागवड करणाऱ्यांना पानवेली वाडवळ असेदेखील म्हणत असत. मुख्य म्हणजे केळी उत्पन्न मोठय़ा प्रमाणात घेतले जात होते. इथे बऱ्याच प्रकारच्या केळींचे उत्पन्न घेतले जाते. जवळपास सगळ्याच समाजाने केळीच्या उत्पन्नाला प्राधान्य दिल्याचे दिसते. राजेळी, वेलची, बसराई, तांबडी इत्यादी प्रकारच्या केळींचे उत्पन्न कमी-जास्त प्रमाणात आजही घेतले जाते.

हा समाज पूर्वी वाडीत जास्त वेळ काम करत असल्यामुळे त्यांनी आपली घरे वाडीतच बांधली होती. एकाच घरातील १०-१२ घरांच्या समुच्चयाला वाडी असे संबोधतात. पूर्वी घरे बांधताना कारवीच्या कुडांचाही वापर केला जाई. कौले, मातीच्या विटा, मातीचा लेप लावून बांधत होते. ओटी, ओसरी, दोन खोल्या, माळा, स्वयंपाकघर, समोर अंगण आणि मागे परस, नाहणी घर अशी एकंदरीत घराची रचना केली जात असे. वाडवळ समाजाची स्वत:ची स्वतंत्र वाडवळी बोली भाषा आहे. त्यानुसार ओटीला ओटला असे म्हणतात. त्यावर लाकडी झोपाळा लावलेला असे.

आता घरांच्या जागेवर स्लॅब टाकलेले बंगले दिसत असले तरी तेथील आधुनिक ओटय़ावरचा झोपाळा कायम आहे. पूर्वीचा ओटा साधारण ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असे. ओसरीवर बसण्यासाठी लाकडी किंवा मातीचा भिंतीला बाक बनवलेला असे. ज्यावर साधारण आठ लोक बसतील एवढा मोठा असे. तसेच सुंभाने विणलेली खाट ही असे. घरात उखळ, मुसळ, दगडी पाटा-वरवंटा, लाकडी पेटी, फडताळे, मातीची मुजी किंवा पराडा, कळंगा (भात साठवण्यासाठी वापरत होते) इत्यादी वस्तू असत.

शेती हा व्यवसाय स्वीकारल्यामुळे, त्याला साजेसा पोषाख परिधान करू लागले. जाडे धोतर, सदरा, पांढरी उंच टोपी. तर काही विशेष प्रसंगी पागोटे आणि उपरण कधी पगडीदेखील परिधान करीत असत. स्त्रिया नऊवारी लुगडय़ाचा आणि खणाच्या चोळीचा वापर करीत होत्या, असे सोमवंशी क्षत्रिय समाजाचे नेते विसाल चोरघे सांगतात. महत्त्वाचे म्हणजे विधवेला पांढरे कपडे घालण्याची सक्ती या समाजात कधीच नव्हती. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार विविधरंगी कपडे घालण्याची मुभा होती, असे चोरघे आवर्जून सांगतात. हा समाज उत्तरोत्तर बदलत गेला. बदल स्वीकारत गेला. हा समाज एकमेकांना साथ देत पुढे गेला. या समाजातील ऊर्वरित माहिती आणि जीवनशैली पुढील भागात..