उरणमधील वीर वाजेकर महाविद्यालय आणि परिसरात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी हे पूर्व विभाग,भेंडखळ,नवघर येथून येथून ये-जा करत असतात. यासाठी एसटी बस पकडण्यासाठी विद्यार्थी हे नवघर उड्डाण पुलाच्या टोकाला असलेल्या एका वळणावर उभे असतात. एकाच वेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उभे राहत असल्याने आणि त्यात हे वळण लहान असल्याने या ठिकाणी अपघाताची मोठी भिती व्यक्त होत आहे.विशेषतः या मार्गावरुन जाणारी अवजड वाहने वळण घेत असतात, तेव्हा वळणावर उभे असलेल्या या विद्यार्थ्यांचा प्रवास धोकादायक झाला आहे.

हेही वाचा >>>ठाण्यात पाणी थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; पंधरा दिवसांत २ कोटी  ९५ लाखांची थकित रक्कम वसुल

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
design courses at iit bombay
डिझाईन रंग- अंतरंग : डिझाईन शिक्षण: विद्यार्थी, पालकांमधील सर्जनशीलता वाढवणारा दुवा
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
Haryana school bus accident,
VIDEO : शाळेच्या बसला भीषण अपघात; पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

उरण पनवेल राज्य महामार्गावर वीर वाजेकर महाविद्यालय व माध्यमिक शाळा आहे.या दोन्ही भागात ३ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील विद्यार्थी शाळेत ये जा करण्यासाठी एसटी बस किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या एनएमएटी बसचा वापर करत असतात. यापूर्वी उरण पनवेल मार्गावरील उरण ते जेएनपीटी या सरळ मार्गाने बसची वाहतूक होत होती. मात्र याच मार्गावरील फुंडे येथील खाडीपूल नादुरुस्त झाल्याने या धोकादायक पुलावरील एसटी बसची वाहतूक आता नवघर,भेंडखळ मार्गे उरणसाठी वळवण्यात आली आहे, नवघर उड्डाणपूलावरून ही सर्व वाहतूक सध्या सुरू आहे.त्यामुळे विद्यार्थी नवघर पुलावर बससाठी उभे राहत आहेत.

हेही वाचा >>>अंबरनाथः चौक्या शोभेपुरत्याच;रासायनिक सांडपाणी नेणाऱ्या टँकरची तपासणी नाहीच

दररोज घोळक्याने उभ्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना या पुलावरून ये जा करणाऱ्या बस आणि अवजड वाहनांमुळे धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी बस थांबा नसल्याने विद्यार्थ्यांना ऊन,पावसात उभे रहावे लागत आहे.विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने उरण पनवेल मार्गावरील खाडी पुलाची दुरुस्ती करण्यात यावी व पूर्ववत बस जुन्या मार्गाने सुरू करण्याची मागणी डीवायएफआय या युवक संघटनेने केली आहे.