At the national level Thane Municipal Corporation ranks third state Indian Cleanliness League ysh 95 | Loksatta

ठाणे : देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक; ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला होता.

ठाणे : देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक; ‘इंडियन स्वच्छता लीग’ उपक्रम
ठाणे : देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक; 'इंडियन स्वच्छता लीग' उपक्रम

ठाणे : केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला होता. या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल देशपातळीवर राज्यात ठाणे महापालिकेचा तिसरा क्रमांक लागला आहे.  नवी मुंबईचा देशात तिसरा क्रमांक लागला आहे. तर, ठाणे शहराचा १३ वा क्रमांक लागला आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Breaking News Live : अकोल्यात घराच्या अंगणात लावली गांजाची झाडे; राज्यातील इतर महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर..

हेही वाचा >>> कल्याणमध्ये मोहन अल्टिजा इमारतीत आग; दोन सदनिका जळून खाक, कोणतीही जीवित हानी नाही

केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाने स्वच्छतेचा अमृत महोत्सव साजरा करताना ‘इंडियन स्वच्छता लीग’ हा राष्ट्रीय उपक्रम जाहीर केला होता. त्यात, देशभरातील १८०० हून अधिक शहरे सहभागी झाले होते. यामध्ये लोकसहभागावर भर होता. त्याचबरोबर स्वच्छता कार्यात तरूणाईचा सहभाग महत्त्वाचा होता. त्यासाठी कचरा विरोधात युवक (#Youth V/s Garbage) ही टॅगलाईन जाहीर करण्यात आली होती. या माध्यमातून प्रत्येक शहराने आपला संघ तयार करणे व या संघाचा कर्णधार जाहीर करणे अपेक्षित होते. त्यानुसार, ठाणेकरांचे प्रतिनिधित्व करणारा ‘ठाणे टायगर्स’ हा संघ जाहीर करण्यात आला होता. ठाणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी लोकसहभागातून स्वच्छता विषयक उपक्रम राबविण्यात आले. उपवन तलाव ते येऊर गाव या मार्गावर ७.५ किमी अंतराची सुमारे ७५०० नागरिकांचा सहभाग असलेली मानवी साखळी तयार केली होती. तसेच नागरिकानी श्रमदान करून त्यांच्या आसपासच्या परिसरातील कचरा गोळा करण्याबरोबरच स्वच्छता अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. महाविद्यालीयन विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि फ्लॅशमॉबही सादर केले होते. दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात ६५० शाळांचा सहभाग असलेली चित्रकला स्पर्धा आणि ‘टाकाऊ ते टिकावू’ ही कला स्पर्धा आयोजित केली होती. त्याचबरोबर, सफाई मित्रांची सफाई दिंडी, स्वच्छता दूतांना विविध सामग्रीचे वाटप, ठाणे स्वच्छता लीगचे उद्घाटन, कचरावेचकांची आरोग्य तपासणी केली होती. स्वच्छता अमृत महोत्सवात ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हा महोत्सव यशस्वी केला. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात इंडियन स्वच्छता लीगचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ठाणे शहराचा क्रमांक राष्ट्रीय पातळीवर पहिला क्रमांक मिळाला असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने सांगितले.

हेही वाचा >>> कल्याण, डोंबिवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाच्यावतीने दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवण्यात येते. यामध्ये यंदा ठाणे शहराने देशात तेरावा क्रमांक तर राज्यात तिसरा क्रमांक पटकवला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीचा क्रमांक राखण्यात शहराला यश आले आहे.  कच-याचे संकलन व त्याची वाहतूक, प्रक्रिया, साफसफाई, जनजागृती, क्षमतावृध्दी आदी निकषांवर स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले होते.

नागरिक जेव्हा झोपेत असतात, त्यावेळी पालिकेचे कर्मचारी शहराची सफाई करीत असतात. हे काम नियमित सुरु असते. ठाणे शहर कचरामुक्त करण्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबवले जात असून त्याचबरोबर घनकचरा निर्मूलनाचे काम सुलभ झाले.  यंदा स्वच्छ सर्वेक्षणात ठाणे अव्वल ठरण्यास ठाणेकरांचाही मोलाची साथ लाभली आहे.

-डॉ. बालाजी हळदेकर, वैद्यकीय अधिकारी, ठाणे

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याणमध्ये मोहन अल्टिजा इमारतीत आग; दोन सदनिका जळून खाक, कोणतीही जीवित हानी नाही

संबंधित बातम्या

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील वाहतूक कोंडीवर उपाय; कल्याण आगारातील बस दुर्गाडी, मुरबाड गणेश घाट येथून सोडण्याचा निर्णय
मुख्यमंत्री उद्या ठाणे महापालिकेत; विविध प्रकल्पांचा आढावा घेण्याबरोबरच विविध उपक्रमांचा शुभारंभ
ठाणे: आर्थिक संकटात असलेल्या पालिकेवर पडणार सातवा वेतन आयोगाचा भार
घनकचरा व्यवस्थापनाऐवजी थेट कचऱ्याला ‘अग्नी’; अंबरनाथमध्ये घनकचरा व्यवस्थापन नियमांची ऐशीतैशी
बदलापूरः इथे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य होतो सरपंच ; सरपंचपदाचा ढोके दापिवली पॅटर्न चर्चेत, प्रत्येक जण सात महिन्याचा सरपंच

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
सनी लिओनीने कपड्यांबाबत वक्तव्य केल्यानंतर उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “तू माझ्या कपड्यांबरोबर…”
मुंबईत ४२ वे अवयवदान; दोघांना मिळाले जीवदान