भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या विचारांनी अखंड भारत आणि भारतीयांना एक वेगळीच ऊर्जा/ शक्ती प्राप्त होते. भारतीय राजकारणात सामाजिक तसेच सांस्कृतिक वारसा जपत त्यांनी आपल्या कवितांनी त्यांना नाविन्य देण्याचा कार्य केले. असे वक्तव्य उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथनी मंगळवारी व्यक्त केले.

दीप कमल फाउंडेशन, मुंबई तर्फे डिसेंबर 2018 मध्ये ठाणे येथे आयोजित करण्यात आलेले “अटल महाकुंभ” याचे ‘लोगो’ नुकतेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. लखनऊमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुंबई भाजपाचे महामंत्री तसेच अटल महाकुंभचे आयोजक अमरजीत मिश्रा यांच्या उपस्थितित विमोचन करण्यात आले.

गेली 10 वर्षे अटल गीत गंगा या कार्यक्रमाला भव्य दिव्य स्वरूप देण्याचा मानस आयोजक अमरजीत मिश्रा यांनी व्यक्त केले. ‘ अटल विचार एव भारतं विश्वगुरुं करिष्यति’ अर्थात अटल विचारच भारत देशाला पुनःश्च विश्व महागुरू बनवू शकतो. उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री श्री आदित्यनाथ योगी यांच्यासोबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मोर्या, प्राविधिक व चिकित्सा शिक्षण मंत्री आशुतोष टंडन, परिवहन राज्यमंत्री स्वतंत्रदेव सिंह यांच्यासमवेत अनेक मंत्री गण व भाजप नेते यांना अटल महाकुंभ चे आमंत्रण देण्यात आले आहे.