शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला

याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती

ठाणे : ठाणे येथील वृंदावन सोसायटी भागात शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जैस्वाल यांच्यावर बुधवारी रात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

वृंदावन सोसायटी येथील श्रीरंग सोसायटी परिसरात अमित जैस्वाल राहतात. या भागात ते शिवसेनेचे विभागप्रमुख आहेत. बुधवारी रात्री ते शिवसेना शाखेजवळ उभे असताना एकजण त्यांना भेटण्यासाठी आला. अचानक त्या व्यक्तिने अमित यांच्या चेहर्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर, हल्लेखोरास शिवसैनिकांनी बेदम चोप दिला. अमित जैस्वाल यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हल्लेखोरावर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Attack on shiv sena worker zws