ठाणे : भिवंडीतील बंदर मोहल्ला भागात असलेल्या एका गोठय़ात अज्ञात व्यक्तीकडून १८ जनावरांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. यामध्ये १६ रेडे आणि दोन म्हशींचा समावेश आहे. या हल्ल्यात चार रेडे आणि एका म्हशीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडीत बंदर मोहल्ला भागात अरहान मोमीन यांचा गोठा आहे. या गोठय़ात २० रेडे आणि दोन म्हशी होत्या. रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती या गोठय़ात शिरले आणि त्यांनी १८ जनावरांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ४ रेडे आणि एका म्हशीचा मृत्यू झाला. तर, बारा रेडे आणि एक म्हैस गंभीररीत्या जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

निजामपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यक्तिगत वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Attack with a weapon on 18 animals kept in cowshed in bhiwandi zws
First published on: 16-05-2022 at 03:57 IST