मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटण्याचा प्रयत्न ; दोघांना अटक | Attempt to robbery Tempo driver on Mumbai Nashik highway two peoples arrested | Loksatta

मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटण्याचा प्रयत्न ; दोघांना अटक

गेल्याकाही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळेत लुटारूंच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक, व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटण्याचा प्रयत्न ; दोघांना अटक
संग्रहित छायाचित्र / लोकसत्ता

ठाणे : मुंबई नाशिक महामार्गावर टेम्पो चालकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. रशीद शेख (२७), वसीम शेख (२०) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. गेल्याकाही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर मध्यरात्रीच्या वेळेत लुटारूंच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे वाहन चालक, व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. झारखंड येथे राहणारे तसलीम अन्सारी हे मुंबई नाशिक महामार्गावरून त्यांच्या टेम्पोने भिवंडीत आले होते.

वाहन चालवून दमछाक झाल्याने त्यांनी गुरुवारी मध्यरात्री मानकोली पूलाजवळील रस्त्याकडेला टेम्पो उभा केला आणि टेम्पोमध्ये आराम करत होते. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोघे त्यांच्या टेम्पोमध्ये शिरले आणि त्यांनी तसलीम यांच्याकडून त्यांचा १० हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. मोबाईल घेऊन दुचाकीवर दोघेही चोरटे निघून जात असता तसलीम यांना त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना मारहाण करून काही अंतर फरफटत नेले.

हेही वाचा : ठाणे पालिकेच्या सफाई कामगारांवर आता जीपीएस प्रणालीद्वारे नजर

दरम्यान, नारपोली पोलिसांचे गस्ती पथक हे त्याठिकाणी गस्ती घालत असताना त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी त्यांची नावे रशीद आणि वसीम असल्याचे सांगितले. तसेच ते भिवंडी येथील नवीवस्ती भागात वास्तव्य करत होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली आहे.गेल्याकाही दिवसांपासून मुंबई नाशिक महामार्गावर लुटारूंच्या काही टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांकडून या भागात गस्ती घातली जात आहे. पोलिसांकडून येथील वाहन चालकांची बैठक घेऊन त्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
ठाणे : मॅजेस्टिक गप्पा आणि ग्रंथप्रदर्शनाच्या कार्यक्रमास आजपासून सुरुवात

संबंधित बातम्या

ठाणे: कोपरी पूलाच्या तुळई बसविण्याचे काम पूर्ण; आता पुन्हा वाहतूक बदलाची आवश्यकता नाही
टीम ओमी कलानी राष्ट्रवादीतच!
शिवसेनेच्या मोर्चामुळे शहरात कोंडी
आताचे सरकार भाजपची कळसूत्री बाहुली – आमदार भास्कर जाधव
डोबिंवली: शीळ रस्त्यावरील दुभाजकामध्ये रस्ता ठेवण्यास ‘एमएसआरडीसी’चा नकार?, परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“महाराष्ट्राच्या दोन मंत्र्यांनी बेळगावला येणं अनुकूल नाही”, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मईंचा इशारा
पोलीस उपनिरीक्षक विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेची निवड यादी जाहीर; यंदा डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शारीरिक चाचणी
‘मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या निर्णयाला जाणीवपूर्वक उशीर’; शिवसेना खासदार अरविंद सावंत यांचा आरोप
विजय दिवस सोहळ्यात यंदा भरगच्च कार्यक्रम; रौप्यमहोत्सवानिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, शरद पवार यांना निमंत्रण
FIFA WC 2022: मोक्याच्या क्षणी ह्वांग ही चॅन चा गोल! द. कोरिया बाद फेरीत दाखल, मात्र जिंकूनही उरुग्वे विश्वचषकातून बाहेर