scorecardresearch

ठाणे : शीळ महापे येथे बीपीसीएलच्या वाहिनीतून डिझेल चोरीचा प्रयत्न

शीळ-महापे मार्गावरील बीपीसीएलच्या वाहिनीतून गुरूवारी पहाटे मोठ्याप्रमाणात डिझेलची गळती होत होती. तपासाअंती चोरट्यांनी भूमिगत वाहिनीतून डिझेल चोरी करण्यासाठी ही वाहिनी फोडण्याचा प्रयत्न केल होता.

ठाणे : शीळ महापे येथे बीपीसीएलच्या वाहिनीतून डिझेल चोरीचा प्रयत्न
शीळ महापे येथे बीपीसीएलच्या वाहिनीतून डिझेल चोरीचा प्रयत्न (संग्रहित छायाचित्र)

शीळ महापे येथील मार्गावरील भारत पेट्रोलियम काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या (बीपीसीएल) भूमिगत वाहिनीतून डिझेल चोरीचा प्रयत्न झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. हा प्रयत्न करताना चोरट्यांनी सहा फूट खड्डा खोदला होता. याप्रयत्नात वाहिनीतून डिझेलची गळती झाली होती.
दरम्यान, या घटनेप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. वाहिनीच्या दुरुस्तीसाठी बीपीसीएलने नाशिकच्या दिशेने होणारा डिझेलचा पुरवठा काही कालावधीसाठी खंडीत केला होता.

हेही वाचा- उल्हासनगरच्या पुनर्विकासाचे विधेयक मंजूर; अनधिकृत बांधकामे नियमीत होणार, हजारो कुटुंबांना होणार फायदा

शीळ-महापे मार्गावरील बीपीसीएलच्या वाहिनीतून गुरूवारी पहाटे मोठ्याप्रमाणात डिझेलची गळती होत असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाली होती. त्यानंतर बीपीसीएलचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभाग, रबाळे एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चोरट्यांनी या भूमिगत वाहिनीतून डिझेल चोरी करण्यासाठी ही वाहिनी फोडण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. मुख्य रस्त्यापासून ही वाहिनी दूर असून ती सहा फूट भूमिगत होती. अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गळती रोखण्यासाठी बीपीसीएल कंपनीने नाशिक- मनमाडच्या दिशेने होणारा डिझेल पुरवठा काही कालावधीसाठी खंडीत केला होता. बीपीसीएलने १९९८ मध्ये मुंबईतील आपल्या रिफायनरीला नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहराशी जोडण्यासाठी २५२ किमीची वाहिनी सुरू केली होती.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-12-2022 at 21:26 IST

संबंधित बातम्या