महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मनसे मेळाव्यामध्ये प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडत मशिदीवरील भोंग्यांना विरोध केलाय. मुंबई तसेच मुंब्रा येथील झोपडपट्टय़ांमधील मदरशांमध्ये गंभीर प्रकार सुरू असल्याने त्यांवर धाडी घालण्याची विनंती पंतप्रधानांना करण्याबरोबरच मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी राज ठाकरेंनी केली. याचवरुन राज्याचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, “राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन,” असं थेट आव्हान दिलं होतं. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उत्तर देण्यात आलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सुप्रिया सुळेंनी करुन दिली २१०० कोटींच्या प्रकरणाची आठवण तर अजित पवार म्हणाले, “राज ठाकरे पलटी मारणारा…”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मागील काही दिवसांपासून राज यांच्या वक्तव्यावरुन सतत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देणाऱ्या आव्हाड यांच्यावर निशाणा साधलाय. “मला वाटतं की जितेंद्र आव्हाडांना भोंगा, मशीद, मुसलमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की त्यांच्या अंगात देव संचारतो. ते भडभड बोलायला सुरुवात करतात. आव्हाड यांनी परवा रात्रीपासून सकाळपर्यंत तीन वेळा प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. गरज काय आहे?”, असा प्रश्न अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना विचारलाय.

narendra modi, PM Narendra Modi,
हुकमी ‘नॅरेटिव्ह’ने यंदा मोदींना हुलकावणी दिली आहे का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
nirmala sitaraman
उलटा चष्मा: पैसे नसलेल्या अर्थमंत्री

नक्की पाहा >> Video: भाषण सुरु असतानाच अजान सुरु झाली अन् गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी…; शिरुरमधील सभेतील व्हिडीओ चर्चेत

तसेच पुढे बोलताना, “मला असं वाटतंय की जितेंद्र आव्हाडांना एक गोष्ट नक्की माहितीय की राज ठाकरेंच्या बाबतीत बोललो की त्यांना प्रसिद्धी मिळते. मुंब्र्यामधील लोक वाह वाह करतात आणि म्हणूनच ते पुढे येतात. तीन तीन वेळा बोलायची काय गरज आहे. आहो एकदा प्रतिक्रिया दिली की ती चालणार आहे टीव्हीवर,” असा टोला जाधव यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> विश्लेषण : राज ठाकरेंनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर चर्चेत आलेलं २१०० कोटींचं ‘कोहिनूर स्क्वेअर’ प्रकरण आहे तरी काय?

“जितेंद्र आव्हाडांना १९९९ नंतरचा इतिहास नीट माहिती नसेल तर त्यांना फक्त ठाण्यातला इतिहास सांगतो, उर्वरित महाराष्ट्राचा जाऊ द्या. ठाण्यात दोन मोठ्या दंगली मी त्यांच्यासमोर आणून देतो २००७-०८ ला राबोडीमध्ये झालेली आणि दुसरी भिवंडीमध्ये झालेली दंगल. यात आपल्या दोन पोलीसांना प्राण गमावावे लागले होते. त्यांची क्रूर हत्या करण्यात आलेली. आज त्यांच्या कुटुंबियांना काय वाटत असेल? याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही. आव्हाडांना मशीद, भोंगा याबद्दल बोलल्यावर पुळका येतो,” अशी टीका जाधव यांनी केलीय.

नक्की वाचा >> “पदासाठी, पैशासाठी गद्दारी करणाऱ्यांनी राज ठाकरेंना कितीही…”; नारायण राणेंनी केली राज ठाकरेंची पाठराखण

“नमाज पठण करु नये, मशिदीत नमाज पठण करायचं नाही असं राज ठाकरे म्हणाले का? जर तुमची श्रद्धा असेल तर ती मंदिराच्या चार भिंतींमध्ये चालते. आज राज ठाकरे पहिल्यांदाच भोंग्यांबद्दल बोलेले नाहीत. आधी पण अनेकदा बोललेत. त्यावेळी तुमच्या लक्षात आलं नाही का? त्यानंतर अनेकदा तुम्हाला राज ठाकरेंची भूमिका बरी वाटली होती,” असं जाधव यांनी म्हटलंय. “हे मुंब्र्यावरील प्रेम आहे. मतदारसंघामधील लोक नाराज होऊ नये म्हणून हे जिंतेंद्र आव्हाडांची तळमळ आहे,” असंही जाधव म्हणालेत.