‘बिबट्याबाबतची नकारात्मकता टाळायला हवी!’

गेल्या आठवड्यात बदलापूर शहरातील कात्रपजवळील डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

बदलापूर : गेल्या काही दिवसांपासून बदलापूर शहराच्या आसपासच्या परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये नकारात्मक वातावरण तयार झाले आहेत. यामुळे बिबट्याच्या अधिवासाला आपण धोका निर्माण करत आहोत. बिबट्याबाबतची अनावश्यक नकारात्मकता टाळायला हवी. जंगलातील प्राणीसाखळी सुस्थितीत राहण्यासाठी बिबट्या अपरिहार्य आहे, असा सूर वन संरक्षक, मानद वनजीवरक्षक आणि वन विभागाच्या संयुक्त बैठकीत प्राणिमित्रांनी लावला. बिबट्याबाबत नागरिकांत प्रबोधन करण्यासाठी वनविभाग पुढाकार घेत असून लवकरच अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्तींना पाचारण केले जाणार असल्याचे वन विभागाने सांगितले.

गेल्या आठवड्यात बदलापूर शहरातील कात्रपजवळील डोंगरावर बिबट्याचा वावर असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. मात्र बिबट्याचा असण्यामुळे मानवी वस्तीला धोका आहे, अशी नकारात्मक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. बिबट्याबाबतची नकारात्मकता कमी करण्यासाठी नुकतेच वन विभागाने पुढाकार घेऊन एका संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते. बदलापूर वन परिक्षेत्र कार्यालयात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्ह्यातील मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड, जिल्ह्याचे उप वनसंरक्षक तुळशीराम हिरवे यांसह प्राणिप्रेमी उपस्थित होते. यावेळी बिबट्याबाबतची वाढलेली नकारात्मकता कमी करण्यासाठी सर्व प्राणिप्रेमींना पुढाकार घ्यायला हवा, असा सूर सर्वांनी लावला. ज्या नागरी वस्तीच्या शेजारील वनात बिबट्याच्या खुणा आढळल्या आहेत, त्या भागातील नागरिकांची जनजागृती केली जाईल, असे हिरवे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Badlapur city in the vicinity leopards negative atmosphere among citizens akp

Next Story
गुन्हेवृत्त : जिल्ह्यत दुचाकी चोरांचा उच्छाद
ताज्या बातम्या